Beauty Hacks : हळद खुलवेल सौंदर्य ; पांढरे केस काळे करण्यासाठी वापरा घरगुती हेअरमास्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Beauty Hacks : आपल्याला माहितीच आहे की हळदी अत्यंत गुणकारी आहे हळदीचा समावेश हा रोजच्या आहारात नेहमीच केला जातो पण त्याऐवजी हळदी ही उत्तम अँटी बॅक्टेरियल घटक म्हणून काम करते. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, हळदीमुळे पचनक्रिया सुधारते. हळदीचा वापर करून तुम्हाला पांढरे केस काळे करण्यास मदत होईल. केसांना तुम्ही हळदीचे काही मास्क लावलेत तर तुमचे केस हळूहळू काळे होण्यास मदत होतील. हे पॅक (Beauty Hacks) कशा पद्धतीने लावायचे आहेत चला पाहूया

हळद आणि खोबरेल तेल (Beauty Hacks)

या दोन्हीचा वापर करताना सगळ्यात आधी तुम्हाला कच्च्या हळदीचे दोन तुकडे घ्यायचे आहेत. हे तुकडे बारीक करून घ्या. आता एका भांड्यामध्ये खोबरेल तेल घ्या आणि ते गॅसवर ठेवा हे तेल थोडं गरम करा आणि त्यामध्ये बारीक केलेली हळद घाला. त्यानंतर हे मिश्रण थोडेसे कोमट असतानाच 15 ते 20 मिनिटे केसांना तुम्ही लावून ठेवा आणि नंतर केस धुवा आठवड्यातून एकदा केसांना अशी हळद लावल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात.

हळद आणि कोरफड

हळदीप्रमाणेच कोरफड ही अत्यंत गुणकारी वनस्पती आहे. हा उपाय करण्यासाठी एक चमचा हळद आणि थोडं कोरफड जेल एक कप पाण्यामध्ये मिसळा. हे मिश्रण तुम्हाला एका स्प्रे बॉटलमध्ये भरायचे आहे. त्यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या केसांच्या मुळापासून टोकापर्यंत स्प्रे करायचा आहे. हे किमान तासभर असंच मिश्रण तुमच्या केसांना राहू द्या आणि त्यानंतर केस धुवून स्वच्छ करा. हे केस काळे होण्यास (Beauty Hacks) मदत करते आणि केस चमकदार सुद्धा बनवते.

अंडी आणि हळद (Beauty Hacks)

अंड्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण हे सर्वाधिक असतं त्यामुळे अंड्यांचा समावेश आहारात केला जातो. जर तुमच्या शरीरामध्ये आवश्यक प्रोटीन असेल तर केस सुद्धा मजबूत बनतील हा हेअर पॅक बनवण्यासाठी दोन अंडी दोन चमचे मध आणि दोन चमचे हळद ही व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर हा हेअर मास्क अगदी स्कॅल्प पासून केसांच्या टोकाला लावायचे आहे आणि नंतर हा मास्क थोड्या वेळाने धुवून टाकायचे आहे. हा पॅक जर तुम्ही आठवड्यातून एकदा केसांना लावला तर पांढरे केस काळे होऊ (Beauty Hacks) लागतात.

हळद आणि दूध

पांढरे केस काळे करण्यासाठी हळदीचा शाम्पू तुम्ही बनवू शकता हा शाम्पू बनवण्यासाठी दोन चमचे हळद, एक चमचा मध आणि थोडे दूध मिसळा केस धुण्यासाठी ही पेस्ट वापरा हे हेअर मास्क म्हणूनही डोक्याला लावता येतो 20 ते 25 मिनिटे केसांवर (Beauty Hacks) ठेवल्यानंतर हे धुवा. कोंडा दूर करण्यासाठी आणि पांढरे केस काळे करण्यासाठी याचा प्रभावी उपयोग होऊ शकतो.