पूर्वीच्या काळी शेविंग करून झाल्यानंतर आफ्टर शेविंग क्रीम उपलब्ध नसायची तेव्हापासून तुरटीचा उपयोग दाढी करून झाल्यानंतर त्वचेवर फिरवण्यासाठी केला जायचा. पण तुम्हाला माहिती आहे का? तुरटीचे खूप सारे उपयोग आहेत. अगदी इवल्याशा तुरटीचे तुकड्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात आजच्या लेखांमध्ये आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत
केसांच्या वाढीसाठी
केसांच्या वाढीसाठीही तुरटी उपयोगी ठरते. यासाठी तुरटीची पावडर तयार करून खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून ती केसांवर लावावी. हे मिश्रण रात्रभर तसंच राहू द्यावं. हलक्या हाताने मालिश करून घ्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी केस शाम्पूने स्वच्छ धुऊन घ्यावेत हा उपाय सलग काही दिवस केल्यानंतर फरक दिसून येईल.
केसातील कोंडा दूर होण्यासाठी
अनेकांच्या केस गळतीचं प्रमुख कारण म्हणजे केसांमध्ये कोंडा असणं हे आहे. सध्याचे प्रदूषित वातावरण आणि बदललेली जीवनशैली यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण जास्त आहे. अशात तुम्ही केसांमधला कोंडा दूर करण्यासाठी तुरटीची पावडर तयार करा आणि त्यामध्ये थोडं लिंबाचा रस आणि पाणी मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांच्या मुळाशी त्वचेची मालिश करा असं केल्यानंतर केसांमधील कोंडा दूर होईल.
केस काळे होण्यासाठी
अकाली केस पांढरे होणे ही मोठी समस्या आहे. तुरटीचा एक उपाय करून तुम्ही तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने काळे करू शकता. यासाठी तुरटीची पावडर कलोंजीच्या तेलामध्ये मिक्स करा. कलोंजीचे हे तेल कलोंजीच्या बियांपासून तयार केले जाते. या बियांना सीड्स ऑफ ब्लेसिंग असं हे म्हटलं जातं कारण या बिया अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत. त्यामुळे जर कलोंजीच्या तेलामध्ये तुरटीची पावडर टाकून त्वचेला मालिश केल्यानंतर डोक्यामध्ये ब्लड फ्लो वाढतो आणि केसांची समस्या ही दूर होते.