Best Beaches In Konkan : कोकणातील सुंदर असे 7 निळेशार समूद्रकिनारे; देतात निर्मळ अन प्रसन्न अनुभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Beaches In Konkan) रोजच्या दगदगीतून थोडासा निवांत वेळ मिळावा असं प्रत्येकाला वाटत. पण कितीही प्रयत्न केला तरी धावत्या जीवनशैलीतून असा वेळ मिळणे जरा कठीणच. अशी धावपळ आयुष्यातील बैचेनी आणि तणाव वाढवते. मानसिक रित्या सुदृढ व्यक्ती जगातील कोणत्याही आव्हानांना हसत सामोरे जाऊ शकतो. त्यामुळे शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याची देखील काळजी घेणे गरजेचे असते. म्हणूनच एखादा विकेंड किंवा मोठी सुट्टी घेऊन स्वतःला वेळ द्या.

मानसिक शांततेसाठी सुंदर आणि दूरवर पसरलेला समुद्रकिनारा कधीही सुखावणारा ठरतो. तुम्हालाही फ्रेश आणि ताजेतवाने व्हायचे असेल तर कोकणातील समुद्रकिनाऱ्यांना भेट द्या. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास समुद्रकिनाऱ्यांची माहिती देणार आहोत. जिथे तुम्ही तुमच्या सुट्ट्या न केवळ एन्जॉय कराल, तर मानसिक शांतता देखील मिळवालं.

1. गणपतीपुळे बीच (Best Beaches In Konkan)

Ganpatipule-Beach

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘गणपतीपुळे’ हे अत्यंत प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे गणपती बाप्पाच्या स्वयंभू मूर्तीचे भव्य असे मंदिर आहे. तसेच इथे निळाशार समुद्र आणि पांढऱ्या वाळूचा किनारा आहे. जो पर्यटकांना आकर्षित करतो. नारळाची उंच झाडे, निळेशार पाणी, ताजी हवा, पांढरी वाळू आणि खारफुटीसारख्या नैसर्गिक वैभवाने नटलेला हा परिसर महाराष्ट्रातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. जिथे मानसिक शांततेसाठी जाणे खरोखरच फायदेशीर ठरेल.

2. गुहागर बीच

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहार बीच हा अत्यंत निर्मळ आणि प्रसन्न पर्यटन अनुभवासाठी प्रसिद्ध आहे. (Best Beaches In Konkan) हा समुद्रकिनारा गुहागर ते असगोली पर्यंत ५ ते ६ किलोमीटर सोनेरी वाळूत पसरलेला आहे. फारच नयनरम्य दृश्यांसह येथील गार वारे आणि समुद्राचे निळेशार पाणी मनावरील ताण कमी करण्यास मदत करते.

3. भाट्ये बीच

रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये समुद्रकिनारा उहाळ्यात फिरण्यासाठी अनेक पर्यटक लांबून येतात. जिथे समुद्राला काजळी नदी येऊन मिळते तिथेच भाट्येची खाडी तयार झाली आहे. (Best Beaches In Konkan) या समुद्र किनारी सुरू झाडांचे वन आहे. जे फारच आकर्षक आहे. तसेच किनाऱ्याजवळ झरी विनायकाचे सुंदर मंदिर आहे. मनाला प्रसन्न करणारा हा बीच एकदा तरी नक्की एक्स्प्लोअर करा.

4. तारकर्ली बीच

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्रकिनारा हा मालवणाहून अवघ्या ८ किलोमीटर अंतरावर आहे. अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असा हा निळाशार समुद्रकिनारा मनाला प्रफुल्लित करणारा आहे. (Best Beaches In Konkan) इथे वॉटर स्पोर्ट्सचादेखील आनंद घेता येईल. खास करून पर्यटक येथे स्कूबा डायव्हिंगसाठी येतात. त्यामुळे सुट्ट्या एन्जॉय करत मूड फ्रेश करण्यासाठी हा समुद्रकिनारा बेस्ट ऑप्शन आहे.

5. आंजर्ले बीच

दापोली शहराजवळ असलेला आंजर्ले समुद्रकिनारा अत्यंत शांत आणि सुंदरतेने नटलेला परिसर आहे. समुद्राचे निळे पाणी आणि आजूबाजूला असलेली नारळाची तसेच पोफळीची झाडे इथल्या सौंदर्यात विशेष भर घालतात. अत्यंत सुंदर आणि स्वच्छ परिसरासोबत ताजी आणि शुद्ध हवा घेण्यासाठी या समुद्रकिनाऱ्यावर लोक येत असतात. (Best Beaches In Konkan) येथेही वॉटर स्पोर्ट्स आहेत. मात्र, इथला शांत परिसर मनावरचा भार हलका कमी करण्यासाठी मदत करतो.

6. हरिहरेश्वर बीच

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर बीच हा अत्यंत सुंदर आणि तितकाच नयनरम्य बीच आहे. इथे खासकरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहताना रमण्यात जी मजा आहे ती काही औरच आहे. येथे हरिहरेश्वरसोबत जोडूनच कोंडिवली बीचदेखील आहेत. हे दोन मुख्य समुद्रकिनारे पर्यटकांसाठी आकर्षण आहेत. येथे पॅराग्लायडिंग आणि वॉटर सर्फिंग सारखे वॉटर स्पोर्ट्सदेखील आहेत.

7. अलिबाग बीच

Alibaug

रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे अत्यंत सुंदर स्थळ आहे. (Best Beaches In Konkan) अलिबागचा समुद्रकिनारा एखाद्या शॉर्ट पिकनिकसाठी किंवा विकेंडसाठी परफेक्ट स्पॉट आहे. त्यामुळे रोजच्या रुटीनचा कंटाळा घालवण्यासाठी अलिबागला जरूर जा.