Best Beaches In Maharashtra : उन्हाळ्यात भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम 5 समुद्रकिनारे; एकदा येऊन तर बघा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Beaches In Maharashtra) ‘थोडी सागरनिळाई, थोडे शंख नि शिंपले…’ हे शब्द एखाद्या मोहक आणि सुंदरतेने नटलेल्या सागरी किनाऱ्यासाठी किती सुयोग्य आहेत ना!! मनाला शांतता आणि क्षणभर विश्रांती हवी असेल तर एखाद्या समुद्रकिनारी वाळूत पाय पसरून बसणे, याहून उत्तम मार्ग तो काय? मुळात समुद्र, वाळू हे नुसते शब्द ऐकूनही ताजेपणाची अनुभूती येते. अशातच उन्हाळयाच्या दिवसात आल्हाददायी अनुभवासाठी अशा एखाद्या समुद्रकिनारी जावे, असे कुणाला वाटणार नाही?

त्यात मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्या की, एखादा पिकनिक प्लॅन होतोच. तुम्हीही अशा प्लॅनिंगची तयारी करत असाल आणि गर्दीच्या गलबलाटापासून दूर जाण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्या कामाची आहे. (Best Beaches In Maharashtra) कारण, आज आपण विविधतेने नटलेल्या, नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या आपल्या महाराष्ट्रातील काही खास समुद्रकिनाऱ्यांविषयी माहिती घेणार आहोत. जिथले नैसर्गिक सौंदर्य अत्यंत विलोभनीय आणि डोळ्यात कायम साठवून ठेवावे वाटेल असे आहे. रोजच्या दगदगीतून बाहेर पडण्यासाठी आणि आरामदायी सुट्टीसाठी या अप्रतिम समुद्रकिनाऱ्यांविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील अप्रतिम असे 5 समुद्रकिनारे
(Best Beaches In Maharashtra)

1. गणपतीपुळे

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘गणपतीपुळे’ हे अत्यंत प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे गणपती बाप्पाच्या स्वयंभू मूर्तीचे भव्य असे मंदिर आहे. तसेच या ठिकाणी निळाशार समुद्र आणि पांढऱ्या वाळूचा किनारा आहे. त्यामुळे इथे पर्यटकांची विशेष गर्दी असते. असे असूनही हा समुद्रकिनारा अत्यंत शांत आणि प्रदूषणमुक्त आहे. नारळाची उंच झाडे, निळेशार पाणी, ताजी हवा, पांढरी वाळू आणि खारफुटीसारख्या नैसर्गिक वैभवाने नटलेला हा परिसर महाराष्ट्रातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. (Best Beaches In Maharashtra)

2. आंजर्ले

दापोली शहराजवळ असलेल्या आंजर्ले समुद्रकिनाऱ्याची बातच काही और आहे. अत्यंत शांत आणि सुंदरतेने नटलेला हा समुद्रकिनारा कायम पर्यटकांना साद घालत असतो. या समुद्रकिनाऱ्याचे निळे पाणी आणि आजूबाजूला असलेली नारळाची तसेच पोफळीची झाडे इथल्या सौंदर्यात विशेष भर घालतात. (Best Beaches In Maharashtra) अत्यंत सुंदर आणि स्वच्छ परिसरासोबत ताजी आणि शुद्ध हवा घेण्यासाठी या समुद्रकिनाऱ्यावर लोक येत असतात. एका शॉर्ट पिकनिकच्या हिशोबाने हा समुद्रकिनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरला आहे. खास बाब म्हणजे या ठिकाणी आपण वॉटर स्पोर्ट्सदेखील आहेत. ज्याचा तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकता.

3. तारकर्ली

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली हे अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. कोणत्याही ऋतूमध्ये तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर जाणे मनाला आनंद देणारे ठरते. हा समुद्रकिनारा मालवणाहून अवघ्या ८ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. अत्यंत स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा म्हणून याची विशेष ख्याती आहे. मुख्य म्हणजे, या समुद्रकिनारी तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. खास करून इथे स्कूबा डायव्हिंगसाठी लोक येतात. पावसाळ्यात येथे वॉटरस्पोर्टस काही काळासाठी बंद केले जातात. मात्र हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पर्यटकांची नुसती मजा मजा असते.

4. मांडवा

(Best Beaches In Maharashtra) शहराच्या गजबजाटापासून दूरवर एक शांत आणि निवांत अनुभूती देणारे पर्यटन स्थळ म्हणून अलिबागजवळील मांडवा हा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. मुंबईपासून साधारण १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या समुद्रकिनारी रानफुले, नारळाची झाडे, पक्षी आणि फुलपाखरे पहायला मिळतात. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे स्वर्गच. या समुद्र किनाऱ्यावरील प्रदूषणमुक्त वातावरण, शुद्ध ताजी हवा आणि हिरवा निसर्ग कायम पर्यटकांना आकर्षित करत असतो.

5. बस्सीन

मुंबईपासून ७७ किलोमीटर अंतरावर वसई विरारच्या नजीक असणारा बस्सीन समुद्रकिनारा देखील अत्यंत लोकप्रिय आहे. शांत आणि निवांत वेळ घालवायचा असेल तर हे स्थळ तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ठरू शकते. कारण इथला विलक्षण समुद्रकिनारा, निळे पाणी, मऊ पांढरी वाळू, घनदाट जंगल, पामचे खोबरे आणि आकर्षक पोर्तुगीज वास्तू तुम्हाला पूर्ण गोव्याचा फील देतात. (Best Beaches In Maharashtra) त्यामुळे अनेक पर्यटक गोव्याला जाण्यापेक्षा बस्सीनं बीचला जाणे पसंत करतात.