Bhangarh Fort : ‘कुणीतरी पाठलाग करतंय…’; भारतातील ‘हा’ कुप्रसिद्ध किल्ला भुताटकीने घेरलेला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bhangarh Fort) आपल्या भारताला अत्यंत भव्य असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे देशभरात विविध ठिकाणी इतिहासाच्या खुणा कायम लक्ष वेधून घेत असतात. अशा ठिकाणांपैकी बरीच ठिकाणे ही पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. तर यांपैकी काही ठिकाणी रहस्यमयी हालचालींचा अनुभव आल्याचे अनेक लोक सांगतात. अशाच एका ठिकाणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. राजस्थानमधील ‘भानगढ’ ही स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तू आहे. जिथे एकटं जाण्याची कुणीही हिंमत करत नाही. असे का? ते जाणून घेऊ.

भूताटकीने घेरलेला भानगढ किल्ला (Bhangarh Fort)

राजस्थानमधील भानगढ ही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अत्यंत पुरातन अशी वास्तू आहे. तिच्याकडे जाताना लोकांचे पाय अक्षरशः लटपटतात. आज २१ व्या शतकातसुद्धा लोक भुताखेतांच्या गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. कारण अनेक लोकांना या ठिकाणी असे काही अनुभव आले आहेत जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. अशा अनेक रहस्यमयी आणि भूतावह ठिकाणी जाण्यास सरकारने बंदी घातलेली आहे.

यामध्ये पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली सारख्या मेट्रो शहरांचा सुद्धा समावेश आहे. यामध्ये राजस्थानच्या कुप्रसिद्ध जूनाट आणि भूताटकीने घेरलेल्या (Bhangarh Fort) भानगढ किल्ल्याचासुद्धा समावेश आहे. हा किल्ला अत्यंत पुरातन वास्तू असला तरीही इथे येणाऱ्या पर्यटकांना कुतूहलापेक्षा जीवाची काळजी जास्त वाटते.

कुणीतरी पाठलाग करतंय..

राजस्थानचा भानगढ किल्ला आज अत्यंत कुप्रसिद्ध असून इथे प्रत्यक्षात जायला सगळे घाबरतात. मुळात हा किल्ला प्रत्यक्षात पाहिल्यावर समजते की, त्याचे तेज आणि त्याच्या भिंतींवरील वास्तुला अत्यंत मोहक तितकीच लक्षवेधी आहे. (Bhangarh Fort) असे असूनही कुणी इथे जायची हिंमत करत नाही. कारण, आजपर्यंत इथे जो कुणी गेला आहे त्याने आपल्यामागे कुणाचीतरी सावली अनुभवली आहे. सतत ‘कुणीतरी आपला पाठलाग करत आहे…’, असे वाटते आणि म्हणून इथे जायला लोक घाबरतात.

याशिवाय किल्ल्यावरून बऱ्याचदा महिलेच्या किंचाळण्याचे, बांगड्या फोडण्याचे आणि रडण्याचे आवाज ऐकू येतात, असेही सांगितले जाते, त्यामुळे भितीमध्ये आणखीच भीती वाढते. या कारणामुळे अनेक पर्यटक इथे आसपास येऊनही किल्ल्यावर जाणे मात्र सोयीने टाळतात.

शापित भानगड किल्ला

भानगढ किल्ल्याच्या (Bhangarh Fort) आसपासच्या गावातील लोक सांगतात की, या किल्ल्याला गुरु बालू नाथ यांचा श्राप आहे. त्याच असं झालं होत की, त्या काळी एका स्थानिक राजाने या किल्ल्याच्या खाली राहत असलेल्या ऋषीमुनींना एक विनंती केली होती. त्याची इच्छा होती की, या जागेशेजारी मोठा भानगढ किल्ला बांधायचा आहे. तेव्हा ऋषी मुनींनी राजाला एका शर्तीवर परवानगी दिली.

ती शर्त अशी होती की, ‘या ठिकाणी तयार होणाऱ्या किल्ल्याची सावली त्यांच्या कुटीवर पडता कामा नये’. यावर दोघांची सहमती झाल्यानंतर किल्ला उभा राहिला. हा किल्ला उभारल्यानंतर समजले की, त्याची सावली कुटीवर पडतेय. ज्यामुळे क्रोधीत होऊन ऋषी मुनींनी त्या गावाला आणि किल्ल्याला शापित केले. तेव्हापासून भानगढ किल्ला (Bhangarh Fort) आणि संबंधित परिसराची दुर्दशा झाल्याचे सांगितले जाते.

जो गेला तो गेलाच….

भानगढ या किल्ल्याविषयी आणखी एक रहस्यमयी गोष्ट सांगायची म्हणजे, इथे सूर्यास्तानंतर आजपर्यंत जे लोक गेले आहेत ते अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे ही जागा खरोखर शापित असून येथे भुताटकी असल्याचे पसरले. ही जागा अत्यंत रहस्यमयी आणि गूढ राखून असल्यामुळे इथे जाणारी पायवाट धूळ खात आहे. या प्रकारानंतर इथे सूर्य मावळल्यानंतर किल्ल्यालर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. (Bhangarh Fort) रात्रीच्या किर्रर्र काळोखात इथे आणखीच भीती दाटून येते.