BSNL ग्राहकांसाठी मोठी बातमी ! जून 2025 पर्यंत सुरू करणार 5G सेवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2025 वर्ष उजडायला अजून दोन महिने आणि काही दिवसच शिल्लक आहेत. त्यातच बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आणली आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या माहितीनुसार बीएसएनएल हे मे 2025 पर्यंत एक लाख बेस स्टेशनच्या माध्यमातून देशभरात 4G सेवा लागू करेल आणि ते जून 2025 पर्यंत 5G नेटवर्कवर जाईल. हि बातमी ग्राहकांसाठी आनंदाची असल्याचे दिसून येते.

2025 पर्यंत एक लाख साइट्स सुरू करण्याचे उद्दिष्ट

भारताने 4G तंत्रज्ञानात इतर देशांच्या मागे राहून सुरुवात केली, मात्र आता भारत 5G तंत्रज्ञानात इतर देशांसोबत चालत आहे. त्याचबरोबर 6G तंत्रज्ञानामध्ये भारत जागतिक नेतृत्व करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की बीएसएनएल कोणत्याही परकीय उपकरणाचा वापर न करता स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करेल . त्याचसोबत भारताकडे एक प्रमुख रेडिओ ऍक्सेस नेटवर्क आहे . ते पुढच्या वर्षी एप्रिल-मेपर्यंत 4G नेटवर्क सुरू करणार असून , जे जून 2025 पर्यंत 5G वर जाईल आणि असे करणारा भारत हा जगातील सहावा देश असेल . आता यांच्या एकूण 38300 साइट्स सुरू असून , त्यांचे 2025 पर्यंत एक लाख साइट्स सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे .

सी-डॉट आणि TCS चे सहाय्य

बीएसएनएलने 6 ऑगस्ट रोजी जाहीर केले होते कि, ते ओवर-द-एयर (OTA) आणि युनिव्हर्सल सिम (USIM) प्लॅटफॉर्म सादर करणार आहे. ते 4G तंत्रज्ञानासाठी सी-डॉट आणि TCS यांच्या सहकार्याने विकसित केलेली स्वदेशी तंत्रज्ञान वापरत करत आहेत . त्यांचे 2025 पर्यंत, BSNL चा 25% ग्राहकवर्ग जोडण्याचा उद्देश आहे.

80% जनतेसाठी 5G सेवा उपलब्ध

देशभरातील 80% जनतेसाठी 5G सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, बीएसएनएलच्या सध्याच्या साइट्समद्ये काही बदल झाले असून , सॉफ्टवेअर अपग्रेड होऊन ते 5G सेवांसाठी तयार केले जाईल. ग्राहकांना आता त्यांच्या मोबाइल क्रमांकावर आधारित सिम कार्ड निवडता येणार असून, कोणत्याही भौगोलिक बंधनाशिवाय सिम बदलता येईल.

5G सेवा जून 2025 उपलब्ध

BSNL ची 5G सेवा जून 2025 पर्यंत सर्वत्र उपलब्ध होईल. ही मोठी बातमी बीएसएनएलच्या ग्राहकांना जलद इंटरनेट आणि प्रगत सेवा देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.