Bike Taxi Rules : महाराष्ट्रातील मोठ्या शहरांत ‘बाईक टॅक्सी’ ; रोजगाराच्या संधीसह दोन महिन्यात लागू होणार नवे नियम

bike taxi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bike Taxi Rules : मोटार वाहन विभागाने ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित टॅक्सी सेवा तसेच बाईक टॅक्सी सेवांना एकसमान नियमनाखाली आणण्यासाठी ‘महाराष्ट्र एग्रीगेटर रेग्युलेशन 2024’ मसुदा तयार केला आहे. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्याचे सादरीकरण करण्यात आले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, प्रवाशांच्या सुरक्षेला नियमांमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. हा धोरणात्मक निर्णय आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून येत्या दोन महिन्यांत हा नियम (Bike Taxi Rules) लागू केला जाईल.

बाईक टॅक्सीतून मिळणार रोजगार (Bike Taxi Rules)

नव्या आराखड्यानंतर आता मुंबई-पुण्यासह राज्यातील सर्व शहरांमध्ये बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. बाईक टॅक्सी सुरू करण्याचा मुख्य उद्देश रोजगार निर्मिती हा आहे. या माध्यमातून महिलांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. महिला चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दोन आसनांमध्ये पुरेसे अंतर राखण्यासाठी स्टँड उभारण्याचा विचार केला जात आहे. हे बदल सध्या अस्तित्वात असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून होणार की परिवहन विभागाकडून याबाबत विचार सुरू आहे.

उशीर झाल्यास, द्यावे लागतील पैसे

प्रवासासाठी ॲपवर आधारित टॅक्सी बुक केल्यानंतर, ड्रायव्हर निर्धारित वेळेपेक्षा उशिरा पोहोचतो…’ अशा सर्वसामान्य तक्रारींवर आता राज्य सरकारच्या परिवहन विभागाने तोडगा (Bike Taxi Rules) काढला आहे. ॲपवर आधारित टॅक्सी चालक 10 मिनिटांत पोहोचला नाही तर संबंधित व्यक्तीला 100 रुपये दंड आकारण्यात येईल आणि ही रक्कम प्रवाशाला देण्यात येईल. हा नियम ‘महाराष्ट्र एग्रीगेटर रेग्युलेशन 2024’ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. विमानतळ, रेल्वे स्थानक, रुग्णालय आदींसाठी बुक केलेली टॅक्सी रद्द करण्यासाठी संबंधित कंपनीकडून प्रवाशाला एकूण दंडाच्या पाचपट रक्कम देण्याच्या नियमाचाही या मसुद्यात समावेश आहे.

अनावश्यक विलंब टाळणे आणि प्रवाशांना चांगला अनुभव देणे हा त्याचा उद्देश असल्याचे सांगत परिवहन विभागाने या नियमाचे समर्थन केले आहे. हा मसुदा परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सादर केला. ॲपवर आधारित टॅक्सी (Bike Taxi Rules) सेवांमध्ये सेवा नाकारल्याच्या अनेक तक्रारी प्रवाशांकडून आल्या आहेत. हे लक्षात घेऊन या आराखड्यात विशेष तरतूद करण्यात आली आहे. सध्या, कंपनी ड्रायव्हरला प्रवाशांच्या गंतव्यस्थानाबद्दल आगाऊ माहिती देते, ज्यामुळे गंतव्यस्थान जवळ असल्यास ड्रायव्हर्स अनेकदा ते नाकारतात. ही समस्या सोडवण्यासाठी ॲपमध्ये बदल करण्यात येणार आहे ज्यामुळे प्रवासी सीटवर बसल्यानंतरच ड्रायव्हरला गंतव्यस्थानाची माहिती मिळेल.

केवळ दंडापुरते मर्यादित न राहता, अशा बाबींचा नियमांमध्ये समावेश करण्यात आला आहे जेणेकरून सर्व खाजगी वाहतूक (Bike Taxi Rules) सेवांसाठी त्याची कठोर अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.