Black Carrot : लाल, केशरी सोडा.. काळं गाजर खाल्लंय का? कॅन्सरपासून करते बचाव; फायदे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Black Carrot) हिवाळ्याच्या दिवसांत घराघरांत गाजर पहायला मिळतात. या हंगामात मोठ्या प्रमाणात गाजर बाजारात दिसून येते. गाजराचा रंग इतका आकर्षक असतो की लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. गाजराचा हलवा, बर्फी, पुऱ्या यांशिवाय कोशिंबिरीत देखील वापर होतो. सलाड मध्ये नियमित गाजर खाणारे बरेच लोक आहेत. तुम्ही आजपर्यंत लाल किंवा केशरी गाजर खूप खाल्ले असेल. पण कधी काळं गाजर खाल्लंय का? होय. काळं गाजर. जसं लाल आणि केशरी गाजर असतं अगदी तसंच काळं गाजर सुद्धा असतं. ज्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.

काळ्या गाजराविषयी अजूनही कित्येक लोकांना माहित नाही. त्यामुळे अशा घरात फक्त लाल आणि केशरी गाजर खाल्लं जात. त्यामुळे आज आपण काळ्या गाजराविषयी माहिती घेणार आहोत. भारत, अफगाणिस्तान आणि तुर्कीमध्ये काळ्या गाजराचा उगम झाला. मात्र आज जगभरात ठिकठिकाणी काळं गाजर पिकवल जातं. चला तर जाणून घेऊया काळ्या गाजराविषयी.

गाजराचा रंग काळा कसा? (Black Carrot)

आपण दैनंदिन आयुष्यात लाल आणि केशरी गाजर खातो. या गाजरामध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे गाजर केशरी किंवा लाल रंगाचे दिसते. तर काळ्या गाजरांमध्ये अँथोसायनिन रसायन मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे त्याचा रंग काळा असतो. काळ्या गाजराचा रंग वेगळा असला तरीही लाल आणि केशरी गाजराइतकेच काळे गाजर सुद्धा आरोग्यदायी आहे. या गाजरात कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता असते. तसेच त्याचे इतरही काही फायदे आहेत. ज्याविषयी आपण जाणून घेऊया.

काळे गाजर खाण्याचे फायदे

1. रोगप्रतिकारक शक्ती वाढते – काळ्या गाजराचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (Black Carrot) कारण या गजरात बॅक्टेरिया आणि व्हायरसशी सामना करण्याची शक्ती असते. परिणामी सर्दी आणि फ्लूसारख्या संसर्गजन्य आजरांपासून संरक्षण मिळते.

2. रक्ताभिसरण चांगले राहते – आपल्या आहारात नियमित काळ्या गाजराचे सेवन केल्यास रक्त शुद्ध होते. इतकेच नव्हे तर यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते. ज्यामुळे रक्ताशी संबंधित समस्या उदभवत नाहीत. शिवाय रक्तवाहिन्यांमध्येही समस्या निर्माण होत नाही. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढते. यामुळे शरीराला रोगापासून संरक्षण मिळते.

3. पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो – (Black Carrot) काळ्या गाजरामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. ज्यामुळे काळे गाजर खाणे पोटासाठी आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर असते. बद्धकोष्ठता, गॅस, छातीत जळजळ, आतड्यांवर सूज येणे, जुलाब आदी समस्या दूर होतात.

4. डोळ्यांसाठी फायदेशीर – काळ्या गाजरात व्हीटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. तसेच यातील बीटा कॅरोटिन डोळ्यांसाठी चांगले असते. यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते आणि हे गाजर नियमित खाल्ल्यास चष्म्याचा नंबरसुद्धा कमी होतो.

5. अल्झायमरपासून बचाव होऊ शकतो – काही अभ्यासानुसार, काळे गाजर खाल्ल्याने अल्झायमरपासून संरक्षण होते. (Black Carrot) काळ्या गाजरात आढळणारे अँटी- इंफ्लेमेटरी आणि अँथोसायनिन यामुळे न्यूरोलॉजिकल आजार होण्याचा धोका कमी होतो.

6. कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते – काळ्या गाजरामध्ये कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता असते. कारण या गाजरात अँथोसायनिन एंथोसाइनिन रसायन असते. जे दाहक- विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. शिवाय काळ्या गाजरातील अँटि ऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. (Black Carrot)