हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बऱ्याचवेळा आकाशात वेगळ्या, विचित्र आणि रहस्यमयी हालचाली होताना दिसतात. ज्यामुळे परग्रहाबाबत विशेष उत्सुकता वाढीस लागते. परग्रह आणि एलियन्स यांच्याबाबत कायम काही ना काही चर्चा सुरु असतात. आकाशात एखादी वेगळी हालचाल दिसली, उडत्या तबकड्या दिसल्या की, साहजिकच सगळ्यांचे लक्ष वेधले जाते. आतापर्यंत पेंटागॉनने बऱ्याचवेळा परग्रहावरील वा पृथ्वीबाहेरील वस्तूंच्या हालचालींविषयी भाष्य केले आहे. आकाशात एखादी अनोळखी गोष्ट उडताना दिसली की, त्यावर संशोधन केले जाते. २०१३ साली अशीच एक घटना समोर आली होती. जिचे रहस्य पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी उलगडले आहे.
आकाशात दिसला महाकाय UFO
वृत्तानुसार, कॅनडातील यूएस संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला सन २०१३ मध्ये एक महाकाय UFO दिसला होता. ज्यावर गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळ संशोधन केल्यांनतर त्यांनी आता दोन पेटंट मिळवले आहेत. याबाबत खुलासा करताना त्यांनी एका रहस्यमय प्रकरणाचा उल्लेख केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. UFO पाहणारे एकूण ३ साक्षीदार होते. ज्यामध्ये एक पेंटागॉनचा अधिकारी होता. ज्याने ‘बार्बेल’ आकाराच्या UFO चे इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा केल्याचा दावा केला आहे.
फुटबॉल मैदानाच्या निम्मा आकार
पेंटागॉनच्या अधिकाऱ्याने म्हटल्यानुसार, हा UFO फुटबॉल मैदानाच्या निम्म्या आकाराचा आणि निळ्या रंगाचा आहे. ही घटना २८ ऑगस्ट २०१३ रोजी कॅनडाच्या नैऋत्य ओंटारियोमध्ये घडली होती. त्यावेळी हे तिन्ही साक्षीदार शिकारीसाठी तळ ठोकून बसले होते. दरम्यान साक्षीदारांनी सांगितले की, आकाशात एक वस्तू शांतपणे उडत होती. मुख्य म्हणजे, ही वास्तू गतीच्या विरुद्ध दिशेने विद्युत ठिणग्या सोडत होती. ही वस्तू त्यांनी कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती वस्तू खूप जवळ असल्यामुळे त्यांच्या उपकरणांनी काम करणे बंद केले.
पेंटागॉन अधिकाऱ्याकडून मोठा खुलासा
याबाबत अधिक बोलताना साक्षीदारांनी म्हटले, ती वस्तू UFO होती हे तिच्यातून निघणारा निळा प्रकाश पाहून खात्री पटली. हा प्रकाश विसंगत प्रकाश नसून लेसरसारखा होता. दरम्यान, पेंटागॉनच्या अधिकाऱ्याने सोनी एचडी कॅमेऱ्यातून या घटनेचे चित्रीकरण केले. यानंतर यूएफओ संशोधक रॉबर्ट पॉवेल यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला. तेव्हा ऑसिलोस्कोपने व्हिडिओमध्ये काही महत्वाच्या गोष्टी सापडल्या. ज्यामध्ये UFO चे फिरते दिवे दिसले. तसेच यूएफओ एक प्रचंड एसी मोटर वापरत होता आणि म्हणून जवळच्या इलेक्ट्रॉनिक्सची सिस्टीम नीट चालत नव्हती, हे समजले. पेंटागॉनच्या अधिकाऱ्याने दिलेली ही साक्ष अत्यंत रंजक असल्याने आता UFO संशोधन आणि तंत्रज्ञानात आणखी इंटरेस्ट वाढू लागला आहे. या घटनेबाबत अजून काही पुरावे किंवा माहिती मिळते का? याचा अद्याप तपास सुरु आहे.