Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार सुकर ; महापालिकेकडून 12 उड्डाणपुलांची दुरुस्ती, मजबुती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai : मुंबईच्या विकासासाठी अनेक नवनवे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. कोस्टल रोड, अटल सेतू , नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईचा कायापालट करतील यात शंका नाही. अशातच आता मुंबई महानगरपालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आता मुंबईतील १२ उड्डाणपुलांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मुबईकरांचा (Mumbai) प्रवास सुकर होणार आहे यात शंका नाही.

भुयारी मार्गांचाही समावेश

मुंबई महापालिकेने (Mumbai) या कामासाठी 23 कोटी 68 लाख रुपये खर्च केला असून काही पुलांचे पावसाळा आधी तर काही पुलांचे पावसाळा नंतर मजबुतीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पूर्व उपनगरातील आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपूल आणि पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यात 12 उड्डाणपूल यांसह भुयारी मार्गाचा समावेश देखील करण्यात आला आहे. सांताक्रुज चेंबूर लिंक रोड महाराष्ट्र नगर भुयारी मार्गाची सुधारणा (Mumbai) याचा देखील यामध्ये समावेश असणार आहे

या 12 उड्डाणपुलांचा समावेश (Mumbai)

कुर्ला एलबीएस जंक्शन येथे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, चेंबूर अण्णाभाऊ साठे उड्डाणपूल, चेंबूर अमर महल जंक्शन फ्लायओव्हर,घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड (घाटकोपर),घाटकोपर GMLR उड्डाणपूल दक्षिण दिशेला,मुलुंड नवघर उड्डाणपूल, सायन पनवेल (Mumbai) महामार्ग आणि महाराष्ट्र नगर भुयारी मार्गाची सुधारणा सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड पूल, एलटीटी आणि कुर्ला दरम्यान पूल,सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील कुर्ला परिसरात डबल डेकर उड्डाणपूल. चेंबूरमधील स्वामी नारायण उड्डाणपूल,सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडचा पूर्व द्रुतगती मार्ग (चेंबूर बेल्ट) कनेक्शन