BMW EV Car Launched: BMW ची इलेक्ट्रिक कार लाँच; पहा किंमत अन फीचर्स

0
1
BMW EV Car Launched
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BMW EV Car Launched – BMW इंडियाने ऑल-इलेक्ट्रिक SUV iX1 LWB (लाँग व्हीलबेस) लाँच केली असून, त्याची किंमत 49 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होईल. BMW iX1 LWB चा eDrive20L M Sport मॉडेल ही कंपनीने बाजारात आणली आहे. या गाडीत अनेक खास वैशिष्ट्ये आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. तसेच हि गाडी आपल्याला कमी किमतीती मिळणार आहे. तर चला याबद्दल अधिक माहित जाणून घेऊयात.

बैटरी, रेंज आणि परफॉर्मन्स –

BMW iX1 LWB मध्ये 66.4 kWh ची बैटरी दिली आहे, जी 531 किलोमीटरपर्यंत रेंज देण्याचा दावा केला जात आहे (MIDC रेंज). या SUV मध्ये 204hp ची मोटर आहे जी 8.6 सेकंदात 0-100 किमी/तास स्पीड मिळवते. या गाडीच्या बैटरीला DC फास्ट चार्जरवर 130kW पर्यंत चार्ज करण्याची क्षमता आहे.

डिझाइन (BMW EV Car Launched)

BMW iX1 LWB च्या बाह्य डिझाइनमध्ये आक्रमक बंपर, 18 इंच M अलॉय व्हील, स्लिम अडेप्टिव LED हेडलाइट्स आणि 3D LED टेललाइट्स यांचा समावेश आहे. गाडीची चौडाई मानक X1 पेक्षा सारखीच आहे, पण तिचा व्हीलबेस 2,800mm वर 112mm वाढलेला आहे आणि एकूण लांबी 4,616mm असून 116mm जास्त आहे. BMW iX1 LWB हि मिनरल व्हाइट, स्कायस्क्रॅपर ग्रे, M कार्बन ब्लॅक, M पोर्टिमाओ ब्लू आणि स्पार्कलिंग कॉपर ग्रे पाच मेटॅलिक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे

इंटीरियरी डिझाइन –

आतील भागात, iX1 LWB मध्ये ‘वाइडस्क्रीन कर्ल्ड डिस्प्ले’ आहे, जो 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आणि 10.7 इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन यांचा समावेश करतो. या गाडीमध्ये पॅनोरामिक सनरूफ, 28.5 डिग्री पर्यंत झुकणाऱ्या रियर सीट्स, 40:20:40 स्लिट फोल्डिंग फंक्शन, ड्यूल-झोन क्लायमेट कंट्रोल, 205W 12-स्पीकर हार्मन कार्डन साउंड सिस्टिम आणि व्हेन्जान्जा लेदर अपहोल्स्ट्री दिली आहे.

सुरक्षा फीचर्स –

BMW iX1 LWB मध्ये लेव्हल 2 ADAS (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम), पार्क असिस्ट फीचर, 8 एयरबॅग्ज, ISOFIX माउंट्स आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यांसारखी सुरक्षा सुविधांचा समावेश आहे. या गाडीच्या विशेष (BMW EV Car Launched)आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह BMW iX1 LWB भारतीय बाजारात एक महत्त्वाची बनली आहे, जी पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने एक मोठा टप्पा ठरू शकते.

हे पण वाचा : 4 कोटींच्या पुढील लक्झरी घरे विक्रीत 53% वाढ ; उच्च-मध्यमवर्गीयांमुळे मागणी वाढली

UPSC देत आहात ? मग या 5 परीक्षांची ही तयारी करू शकता!