खिंडीत सापडलेल्या काँग्रेसचा मी बाजीप्रभू; बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्त्यांना दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज आणि पर्यायाने हिंदवी स्वराज्य अडचणीत असताना बाजीप्रभू देशपांडे यांनी पळून न जाता खिंड लढवून महाराज आणि स्वराज्याला मदत केली होती. काँग्रेस पक्ष अडचणीत असताना आपणसुद्धा असंच काम करत असून अडचणीत सापडलेल्या काँग्रेससाठी मी बाजीप्रभू आहे, असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वर इथं मंगळवारी झाला त्यावेळी थोरात बोलत होते.

राज्य पातळीवर माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. दोन महिन्यांपासून दररोज अठरा तास काम करतो आहे. बऱ्याच लोकांना वाटते काँग्रेसमधून अनेकजण सोडून गेले, आता कसं होणार. मात्र चिंता करण्याचं काही कारण नाही असं सांगत पक्षाची दमदार वाटचाल आजही सुरू असल्याचं थोरात यावेळी म्हणाले. १९९९ मध्येही असे अनेक मोठे नेते पक्षाला सोडून गेले होते. आता ते कोठे आहेत, ते जनतेने पहावे. काँग्रेस उठली की दणकून उठते हा इतिहास आहे. यावेळीही असेच होणार असून पुढचा मुख्यमंत्री आघाडीचाच असेल असा विश्वासही थोरातांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment