चंद्रकांत पाटील युतीमधून बाहेर, एकनाथ खडसेंच्या मुलीविरुद्ध राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र भैय्या पाटील यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजितदादा पवार यांनी मला राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केल्याने आता खरी रंगत भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे खेवलकर आणि राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये रंगणार असल्याने सर्वांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत असल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे.

Leave a Comment