प्रणिती शिंदेंकडून आचारसंहिता भंग? नरसय्या आडम यांची तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। राज्यभरात शनिवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झालेली असताना सोलापुरात पहिल्याच दिवशी माजी आमदार नरसय्या आडम यांनी शहर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटप करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी आमिष म्हणून मेकअप बॉक्सचे वाटप केले. दुपारी आचारसंहिता लागू झाल्यानंतर ही बॉक्स वाटप झाल्याचा आरोप आडम यांनी केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मात्र, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मेकअप बॉक्सचे वाटप केल्याचे म्हटले आहे. शिवाय पक्षाने अजून माझी उमेदवारी ही जाहीर केलेली नाही, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, ‘पोलिस आणि संबंधित अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतील,’ असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी म्हंटले आहे. यावर आता आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून आडम मास्तर निव्वळ स्टंटबाजी करतात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ‘ते महिलांचा अपमान करत’ असल्याचे सुद्धा प्रणिती शिंदेकडून स्पष्टीकरण देण्यात आल आहे.

Leave a Comment