आषाढी एकादशी विशेष : ज्ञानबो तुकारामांचे अभंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आषाढी एकादशी विशेष | अमित येवले

आज आषाढी एकादशी,  ग्यानबा-तुकारामचा जयघोष करीत लाखो वारकरी व भाविका आज विठुरायाचं स्मरण व दर्शन घेतात. आजच्या ह्या खास एकादशीच्या निम्मिताने तर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ यांची आठवण व यांचे अभंग आज प्रत्येकाला आठवणार नाही अस होणारच नाही. जरी आजचा दिवस हा सावळ्या विठ्ठलाचा असला तरी ज्ञानोबा-तुकाराम यांच्यासह अन्य संतांची आठवण व त्यांचे काव्य हे प्रत्येकाला आवर्जून आठवतात. कारण ह्या संतांचे काव्य व अभंग हे आजही प्रत्येकाला कालसुसंगत व सामर्थ्यशाली वाटतात.

नामाची भक्ती व महिमा सांगतांना जगद्गुरु तुकाराम म्हणतात, “तुटो हे मस्तक, फुटो हे शरीर । नामाचा गजर सोडू नये” अशा शब्दात त्यांनी विठ्ठल नामाचा महिमा अधोरेखित केला आहे. तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या काव्याची व अभंगाची मुख्य प्रेरणा म्हणजेच भक्ती आहे. त्यांचे प्रत्येक काव्य अभंग हे भक्तीभाव दखावतात. ‘शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन’ असे मानणाऱ्या या संतांचे काही लोकप्रिय अभंग आपण पाहुयात व आजच्या पवित्र दिवशी त्यांच्या ह्या अभंगातूने आपली भक्ती प्रकट करूया.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥

अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे ॥१॥
सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासि न ये तुझें ॥२॥
कीर्तनीं बैसतां निद्रें नागविलें । मन हें भुललें विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति । न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥४॥

हेंचि दान देगा देवा । तुझ्या विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेंचि माझी सर्व जोडी ॥२॥
न लगे मुक्ति आणि सम्पदा । सन्त संग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावें आम्हांसी ॥४॥

नाचूं कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावुं जगीं ॥१॥
सर्व सांडुनी माझाई । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥
परेहून परतें घर । तेथें राहूं निरंतर ॥३॥
सर्वांचें जें अधिष्ठान । तेंचि माझें रुप पूर्ण ॥४॥
अवघी सत्ता आली हाता । नामयाचा खेचरी दाता ॥५॥

देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥१॥
चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥२॥
वदनीं तुझें मंगळनाम । ह्रुदयीं अखंडित प्रेम ॥३॥
नामा म्हणे केशवराजा । केला नेम चालवी माझा ॥४॥

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।

येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ।।

आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ।।

कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ।।

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ।।

तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ।।

अमित येवले

9403839394

Leave a Comment