BSNL 4G Service: सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2025 पर्यंत 4G सेवा पूर्णपणे अपग्रेड होणार

BSNL 4G Service
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL 4G Service – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल (BSNL) सेवा सुधारण्यासंबंधी खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या भूमिकेचा परिणाम आता दिसून येत आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीएसएनएलच्या यंत्रणेला अलर्ट मोडवर आणण्यात आले असून, सेवा लवकरच सुधारण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. BSNLनेटवर्क सेवेत तातडीने सुधारणा करण्यासाठी, केंद्रीय मंत्री शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, 4G अपग्रेडेशनच्या कामाला गती दिली आहे. 2025 च्या मे-जून महिन्यांपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील BSNL सेवा पूर्णपणे 4G मध्ये अपग्रेड केली जाणार आहे. यामध्ये 187 साइट्सचा समावेश असणार आहे, त्यापैकी 25 साइट्स सुरु झाल्या आहेत.

सिंधुदुर्गात हायस्पीड इंटरनेटसाठी प्रयत्न –

सिंधुदुर्गात हायस्पीड इंटरनेट सेवाही जलदगतीने सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 4G अपग्रेडेशनच्या अंतर्गत 323 साइट्सची योजना करण्यात आलेली आहे, त्यात 38 नवीन 4G साइट्स आणि 285 वर्तमान साइट्सचा समावेश आहे. यामध्ये चार साइट्स सुरु झाल्या आहेत आणि उर्वरित सर्व साइट्स जून 2025 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील BSNL सेवा (BSNL 4G Service)

बीएसएनएलच्या सेवांच्या नेटवर्क उपलब्धतेत सुधारणा करण्यासाठी 35 बॅटरी सेट आणि 125 पॉवर प्लांट वितरित करण्यात येत आहेत. याआधी सुरू केलेल्या 41 बॅटरी सेट आणि 15 पॉवर प्लांट सोबत या उपाययोजनांच्या अंमलबजावणीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल सेवा अधिक सक्षम होईल, असा विश्वास खासदार नारायण राणे यांना मंत्र्यांनी दिला आहे.

ट्रान्समिशन नोड्सच्या स्थापनेसाठी योजना –

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बैंडविड्थ सुधारण्यासाठी 32 ट्रान्समिशन नोड्सच्या स्थापनेसाठी योजना आखली आहे, ज्यामुळे मोबाइल, एफटीटीएच आणि लीज्ड लाइन ग्राहकांच्या उच्च बैंडविड्थच्या आवश्यकतांची पूर्तता केली जाईल. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी 1600 जीबीपीएस क्षमतेचा हाय स्पीड ट्रान्समिशन नोड लवकरच स्थापित करण्यात येणार आहे. या सर्व उपाययोजनांमुळे बीएसएनएल (BSNL 4G Service) सेवा सुधारणार असून, आगामी काही महिन्यांत सिंधुदुर्गातील इंटरनेट आणि नेटवर्क सेवा अधिक प्रभावी बनतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा : केंद्रीय बजेट अन राज्य बजेटमध्ये काय वेगळं ?