BSNL Recharge Plans: BSNL चे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स ; फक्त 107 रुपयांमध्ये मिळवा जबरदस्त फायदे

BSNL Recharge Plans
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL Recharge Plans- भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही भारतातील सरकारी दूरसंचार कंपनी असून, सध्या ती ग्राहकांना अनेक स्वस्त आणि आकर्षक रिचार्ज प्लॅन्स देत आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या महागड्या प्लॅन्समुळे अनेक ग्राहक बीएसएनएलकडे वळत आहेत. जुलै महिन्यात बीएसएनएलने आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या दरांमध्ये बदल केले, त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत जास्त फायदे मिळू लागले आहेत. जर तुम्हीही खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या महागड्या प्लॅन्समुळे चिंतेत असाल, तर तुमचा नंबर बीएसएनएलवर पोर्ट करून स्वस्त रिचार्जचा फायदा घेऊ शकता. बीएसएनएलमध्ये 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे काही चांगले रिचार्ज प्लॅन्स आहेत, जे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. तर चला या स्वस्त रिचार्जबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

BSNL चे स्वस्त रिचार्ज प्लॅन्स (BSNL Recharge Plans)-

107 रुपयांचा प्रीपेड प्लॅन –

बीएसएनएलचा 107 रुपयांचा प्लॅन 35 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 200 लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिनिट्स मिळतात. तसेच या प्लॅनमध्ये एकूण 3 जीबी डेटा देखील उपलब्ध आहे. कमी बजेटमध्ये हा प्लॅन चांगल्या फायद्यासह येतो. त्यामुळे ग्राहकांना रिचार्जसाठी चांगला पर्याय उपलब्ध आहे.

153 रुपयांचा प्रीपेड प्लॅन –

बीएसएनएलचा (BSNL Recharge Plans) 153 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 26 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. पण डेटा वापरण्यासाठी केवळ 1 जीबी मर्यादा आहे. डेटा संपल्यानंतर 40 केबीपीएस स्पीडने इंटरनेटचा वापर करता येतो.

199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन –

बीएसएनएलचा 199 रुपयांचा हा प्लॅन 30 दिवसांच्या पूर्ण व्हॅलिडिटीसह उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, आणि रोज 100 फ्री एसएमएसचा लाभ मिळतो. हा प्लॅन त्याच्या चांगल्या सुविधांमुळे ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. खासगी कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलकडून स्वस्त (BSNL Recharge Plans) आणि चांगल्या सेवा मिळत असल्याने ग्राहकांची पसंती वाढली आहे. त्यामुळे भविष्यात बीएसएनएल अधिक ग्राहकांना आकर्षित करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

हे पण वाचा : तुमची कार कधीच चोरीला जाणार नाही ; जाणून घ्या महत्वाच्या टिप्स