BSNL Recharge Plans : BSNL चा 399 रुपयांचा रिचार्ज; 1000 GB डेटा, 8 OTT प्लॅटफॉर्म्स अन बरंच काही

0
1
BSNL Recharge Plans
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL Recharge Plans – बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी एक अत्याधुनिक फायबर बेसिक प्लस प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएस, ओटीटी सबस्क्रिप्शन आणि 1000 जीबी पेक्षा जास्त डेटा मिळतो. सध्याच्या स्पर्धेच्या वातावरणात, जिजो, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल सारख्या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत आहेत. बीएसएनएलने आपल्याला विविध फायबर्स आणि ब्रॉडबँड प्लॅन्समध्ये अनेक आकर्षक बेनिफिट्स दिले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना अधिक फायदा होणार आहे. तर चला त्या प्लॅन बदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

399 रुपयांचा प्लॅन (BSNL Recharge Plans)-

बीएसएनएलचा 399 रुपयांचा प्लॅन देखील लोकप्रिय आहे, ज्यामध्ये एक महिन्याच्या व्हॅलिडिटीसह 30 एमबीपीएसच्या वेगाने 1000 जीबी डेटा दिला जातो. यासोबतच, तुम्हाला देशभरात फिक्स्ड कनेक्शनद्वारे मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो.

999 रुपयांचा प्लॅन –

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये 8 लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन मिळते. यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार प्रीमियम, सोनीलिव्ह, आणि वूट यांचा समावेश आहे. 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये हाय स्पीड इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ओटीटी सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

सुपरस्टार प्रीमियम प्लस ब्रॉडबॅंड प्लॅन –

बीएसएनएलच्या (BSNL Recharge Plans) सुपरस्टार प्रीमियम प्लस ब्रॉडबॅंड प्लॅनमध्ये 150 एमबीपीएसचा हाय स्पीड आणि 2000 जीबी डेटा दिला जात आहे. यामध्ये तुम्ही दररोज 60 जीबी पेक्षा जास्त डेटा वापरू शकता, तसेच फिक्स्ड कनेक्शनद्वारे देशभरात मोफत कॉलिंगचा आनंद घेऊ शकता. या नवीन प्लॅन्ससोबत, बीएसएनएल आपल्या ग्राहकांना अधिक चांगले इंटरनेट अनुभव देण्याच्या उद्देश आहे.