BSNL चा परवडणारा रिचार्ज प्लॅन ; 2399 रुपयांत 395 दिवसांची व्हॅलिडिटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही महिन्यांपासून जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (vi) सारख्या कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक चिंतेत होते. याच काळात बीएसएनएलने नवनवीन प्लॅन आणून लोकांचे लक्ष आकर्षित करून घेतले . त्याचाच परिमाण म्हणजे असंख्य ग्राहक बीएसएनएलकडे वळताना दिसत आहेत. तसेच आता बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी 2399 रुपयांचा एक खास प्लॅन बाजारात आणला असून, ज्यामध्ये ग्राहकांना 395 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. हा प्लॅन बाजारातील इतर कंपन्यांच्या तुलनेत वेगळा आहे आणि आकर्षिक ठरणार आहे. तर चला या प्लॅन बदल अधिक माहिती जाणून घेऊयात .

BSNL चा 2399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

या 2399 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनेक आकर्षक फायदे आहेत. सर्वप्रथम या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो, ज्यामुळे ग्राहकांना कॉलिंगसाठी कोणत्याही प्रकारची चिंता नाही. दुसरे म्हणजे या प्लानमध्ये रोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो, ज्यामुळे इंटरनेट ब्राउझिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि सोशल मीडिया वापरणे सोपे होते. तसेच यामध्ये एकूण 395 दिवसांसाठी 790GB डेटा उपलब्ध आहे, आणि डेटा संपल्यानंतरही 40Kbps वेगाने डेटा वापरण्याची सुविधा मिळणार आहे . त्याचबरोबर, रोज 100 मोफत एसएमएस मिळतात, जे मॅसेज पाठवण्यासाठी आदर्श आहेत. एकूणच, हा प्लॅन ग्राहकांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, भरपूर डेटा आणि एसएमएस सुविधा देतो, ज्यामुळे ग्राहकांना अधिक फायदे मिळतात.

प्रत्येक दिवशी केवळ 6 रुपये खर्च –

बीएसएनएलचा 2399 रुपयांचा प्लॅन ग्राहकांना एक आकर्षक ऑफर प्रदान करत आहे, ज्यामुळे प्रत्येक दिवशी केवळ 6 रुपयांमध्ये उत्तम डेटा आणि मोठी व्हॅलिडिटी मिळवता येते. या प्लॅनची प्रमुख फायदेशीर गोष्टी म्हणजे वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही, आणि ग्राहकांना कमी खर्चात अधिक डेटा मिळतो. यामुळे बीएसएनएलला ग्राहकांमध्ये लोकप्रियता मिळाली असून, बाजारात आपली खास ओळख निर्माण केली आहे. सवलतीमुळे बीएसएनएलने मोठ्या प्रमाणावर नवीन ग्राहक आकर्षित केले आहेत, ज्यामुळे त्याचे ग्राहकसंख्या वाढली आहे आणि कंपनीला इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी ओळख मिळवता आली आहे.