Budget 2024 : आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून मंगळवारी दिनांक 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पांकडून मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्यांना मोठी आशा आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य माणसाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं (Budget 2024) आहे.
2024 च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन गरिबांसाठी मोठी घोषणा करू शकतात ज्यामुळे देशातल्या तीन कोटी गरिबांचं हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल हे कशावरून ? तर फेब्रुवारी महिन्यात जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अंतिम अर्थसंकल्प सादर केला होता तेव्हा त्याने प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत भाष्य केलं होतं. याबरोबरच मध्यमवर्गीयांसाठी नवीन गृहनिर्माण योजना आणण्याचा आश्वासनही दिलं होतं त्यामुळे आता या अर्थसंकल्पात (Budget 2024) यावर ठोस घोषणा होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी अधिक निधी दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच नवीन निधी उपलब्ध झाल्याने मार्च 2025 पर्यंत ग्रामीण भागात 31.4 लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट गाठता येणार आहे. पंतप्रधान आवास योजना ही मोदी सरकारची प्रमुख योजना आहे. 2024 पर्यंत ग्रामीण भागात 2.95 कोटी घर बांधण्याचं (Budget 2024) या योजनेचं उद्दिष्ट आहे.
मात्र केंद्र सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत देशात 2.63 घरांचा बांधकाम पूर्ण झाले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत बहुतेक राज्यांमध्ये केंद्र सरकार घराच्या किमती 60% रक्कम खर्च (Budget 2024) करतात उर्वरित खर्च राज्य सरकार उचलतात. एवढेच नाही तर ईशान्येकडील राज्यांमध्ये हा खर्च केंद्राच्या वाट्याला 90% पर्यंत जातो. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये (Budget 2024) शंभर टक्के खर्च केंद्र सरकार करते. एकूणच यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने घोषणा होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.