Budget 2025: अर्थसंकल्पात मोठी घोषणा ; डेअरी आणि मत्स्यपालन व्यवसायाला 5 लाख कर्ज मिळणार

0
3
Budget 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2025 – ज्या अर्थसंकल्पाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो , तो आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करत आहेत. या अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच त्यांनी गरीब, शेतकरी आणि महिलांवर सरकारचा भर असल्याचे सांगितले आहे. यासोबतच त्यांनी अनेक क्षेत्रांच्या विकासाच्याही घोषणा केल्या आहेत. यातील एक प्रमुख घोषणा म्हणजे ज्या लोकांना डेअरी आणि मत्स्यपालन व्यवसाय सुरु करायचा आहे , त्यांच्यासाठी 5 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे हा व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर चला जाणून घेऊयात याबद्दल अधिक माहिती .

5 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध (Budget 2025) –

वित्तमंत्रीच्या या घोषणेमुळे शेतकरी, उद्योजक आणि अन्य व्यवसायिक आपला डेअरी किंवा मत्स्यपालन व्यवसाय सुरू करू शकतात किंवा त्याचा विस्तार करू शकतात. सरकारच्या विविध योजनांद्वारे आर्थिक सहाय्य मिळवून कर्ज घेणाऱ्यांना व्यवसायाची वाढ आणि यशस्वीतेसाठी आवश्यक संसाधनांची उपलब्धता होईल. याचा मुख्य उद्देश छोटे आणि मध्यम उद्योजकांना वित्तीय साहाय्य उपलब्ध करून देणे आहे, जेणेकरून ते आपला व्यवसाय वाढवू शकतील आणि राज्यात कृषी व मत्स्य उत्पादनात वाढ होईल.

व्यवसायांमध्ये सकारात्मक बदल होणार –

या निर्णयामुळे विविध जिल्ह्यांतील डेअरी आणि मत्स्यपालन व्यवसायांमध्ये सकारात्मक बदल होणार आहे , असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. या निर्णयामुळेच (Budget 2025) जे लोक हा व्यवसाय करत आहेत, किंवा करण्याचा विचार करत होते त्याना मोठी खुशखबर मिळाली आहे.