हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2025 – देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला केंद्रीय बजेट सादर करणार आहेत. या बजेटमध्ये भारतीय रेल्वेच्या संदर्भात मोठ्या घोषणा होऊ शकतात, ज्यामुळे सामान्य नागरिकांना प्रवास करताना सोय होऊ शकते. जर आपण मागील दशकावर नजर टाकली तर प्रवाशांची सुरक्षा हे रेल्वेचे प्रमुख लक्ष्य राहिले आहे. फक्त 2015 वित्त वर्षात सरकारने सुरक्षा संबंधित उपक्रमांसाठी बजेटमध्ये जवळपास 1.8 लाख कोटी रुपये ऑलॉट (allotted) केले होते. तर चला या बातमीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात .
रेल्वे नेटवर्कवर सरकारचा मुख्य फोकस (Budget 2025)-
सूत्रांच्या मते, रेल्वे बजेटमध्ये वंदे भारत, अमृत भारत अशा अनेक नवीन ट्रेनच्या घोषणा होऊ शकतात. तसेच, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भातही मोठी घोषणा होऊ शकते. याशिवाय, वरिष्ठ नागरिकांना 50 टक्के भाड्यात सवलत मिळू शकते. या सवलती आधीही दिल्या जात होत्या, परंतु कोविडनंतर त्या थांबवण्यात आल्या होत्या. निर्मला सीतारमण यांनी 2024-25 मध्ये रेल्वेसाठी 2.52 लाख कोटी रुपये विभाजन केले होते. यावेळी, ही रक्कम 2.80 लाख कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते, या बजेटमध्ये उच्च गती रेल्वे नेटवर्कवर सरकारचा मुख्य फोकस असू शकतो.
रेल्वे बजेटमध्ये घोषणा –
भारताची स्वदेशी ट्रेन टक्कर बचाव प्रणाली ‘कवच’ रेल्वे सुरक्षा सुधारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती करत आहे. ऑक्टोबर 2024 पर्यंत कवच प्रणाली 1,548 रूट किलोमीटर (RKM) क्षेत्रामध्ये लागू करण्यात आली आहे, ज्यामध्ये दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा अशा महत्त्वपूर्ण मार्गांचा समावेश आहे. या तंत्रज्ञानाचा वापर हळूहळू 3,000 किलोमीटर (RKM) पर्यंत केला जाईल. याबाबत रेल्वे बजेटमध्ये (Budget 2025) घोषणा होण्याची शक्यता आहे
हे पण वाचा : चीनच्या AI मॉडेलची जगाला धडकी!! OpenAI, META संकटात?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज