Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (1 फेब्रुवारी 2025) देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केला. सलग आठव्यांदा अर्थसंकल्प मांडताना, त्यांनी गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करताना, “धनधान्य योजना” सुरू करण्याची घोषणा केली. तसेच, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले
.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2025 (Budget 2025) मध्ये अनेक वस्तू स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. विशेषतः इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार आहेत, कारण त्यावरील करात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ई-वाहने खरेदी करणे अधिक परवडणारे होईल. बजेटमधील सवलतीमुळे ग्राहकांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे मिळणार आहेत.
काय झाले स्वस्त?
- कॅन्सरवरील 36 औषधे
- मेडिकल उपकरणे
- LED दिवे
- भारत निर्मित कपडे
- मोबाइल फोन बॅटरी
- 82 वस्तूंवरील सेस हटवण्यात आला
- लेदर जॅकेट
- शूज, बेल्ट आणि पर्स
- इलेक्ट्रिक वाहने (EVs)
- LCD आणि LED टीव्ही
- हॅंडलूम फॅब्रिक्स
काय होणार महाग ?
इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल डिस्प्लेवरील सीमाशुल्कात वाढ
अर्थसंकल्पात घरं महागणार आहेत.
- फॅबरिक
- आयात केलेल्या मोटारसायकली, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट्स, पॅनेल डिस्प्ले आणि प्रीमियम टीव्ही महाग होणार




