Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळालं? फडणवीस आणि अजित पवारांची आकडेवारीसह प्रतिक्रिया

0
1
fadanvis on budget
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करून अनेक करदात्यांना मोठा (Budget 2025) दिलासा दिला. तसेच उद्योग, आरोग्य, तंत्रज्ञान, कृषी यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या आर्थिक तरतुदी केल्या. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून गंभीर आजारावरील 36 औषधे ड्युटी फ्री करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रासाठी काय तरतुदी? (Budget 2025)

निर्मला सीतारमण यांनी विविध राज्यांसाठी मोठ्या तरतुदी जाहीर केल्या. मात्र, महाराष्ट्राला किती निधी मिळाला? यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकडेवारीसह प्रतिक्रिया दिल्या.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट – महाराष्ट्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात मुख्य तरतुदी
(टीप: ही प्राथमिक माहिती असून, मंत्रालय आणि रेल्वेची सविस्तर आकडेवारी लवकरच येईल.)

मुंबई मेट्रो: 1255.06 कोटी
पुणे मेट्रो: 699.13 कोटी
एमयुटीपी (MUTP): 511.48 कोटी
मुंबई MMR हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे: 4004.31 कोटी
आर्थिक क्लस्टर विकास: 1094.58 कोटी
महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी
महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क: 596.57 कोटी
नागनदी सुधार प्रकल्प: 295.64 कोटी
मुळा-मुठा नदी संवर्धन: 229.94 कोटी
ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प: 186.44 कोटी

अजित पवारांकडून समाधान व्यक्त (Budget 2025)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आणि महाराष्ट्रासाठी जाहीर झालेल्या निधीबद्दल माहिती दिली.

एमयुटीपी-3 प्रकल्प: 1465.33 कोटी
पुणे मेट्रो: 837 कोटी
मुळा-मुठा नदी संवर्धन (JICA अंतर्गत): 230 कोटी
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (चार प्रकल्पांसाठी): 4003 कोटी
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्था: 126.60 कोटी
मुंबई मेट्रो: 1673.41 कोटी
महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणा: 683.51 कोटी
महाराष्ट्र ऍग्री बिझनेस नेटवर्क (MAGNET प्रकल्प): 596.57 कोटी
ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्प: 186.44 कोटी
इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प, मुंबई: 652.52 कोटी
आर्थिक क्लस्टर जोडणीसाठी निधी: 1094.58 कोटी

महाराष्ट्राला परिवहन, पायाभूत सुविधा, कृषी आणि शहरे यांच्या विकासासाठी मोठ्या (Budget 2025) प्रमाणावर निधी जाहीर करण्यात आला आहे. फडणवीस आणि अजित पवार दोघांनीही राज्याच्या विकासासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले आहे.