Budget 2025: बजेटमध्ये शेतकऱ्यांना दिलासा? किसान सन्मान निधीच्या हप्त्यात होणार वाढ?

Budget 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2025 – देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला जाणार असून , या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष आहे. गेल्या अर्थसंकल्पातही सरकारनं शेतीला 9 प्राधान्यक्रमात अग्रस्थानी ठेवले होते . त्याचबरोबर शेतकरी आंदोलनामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घोषणेत सरकार किसान सन्मान निधीच्या हप्त्यात (Kisan Samman Nidhi) वाढवेल , असा अंदाज आहे. तर चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ (Budget 2025)

फेब्रुवारी 2025 अर्थसंकल्पात (Budget 2025) सरकार किसान सन्मान निधीच्या (PM-KISAN) हप्त्यात वाढ करू शकते. आतापर्यंत किसान सन्मान निधी योजनेमार्फत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळत होते. आता ही रक्कम 8000 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे . संसदेच्या कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयक स्थायी समितीने 17 डिसेंबर रोजी लोकसभेत सादर केलेल्या अहवालात ती वाढवून 12 हजार रुपये करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे आताच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो .

पीक विमा योजनेची व्याप्ती –

या बजेटमध्ये पीक विमा योजनेची (Pik Vima Yojana) व्याप्ती वाढविली जाऊ शकते. कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकताच या योजनेचा फायदा सांगितला होता. अशा परिस्थितीत सरकार या योजनेत मोठे बदल करू शकते. संसदेच्या स्थायी समितीनेही तशी शिफारस केली होती. तसेच दोन हेक्टरपर्यंत ज्यांची शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांनाही युनिव्हर्सल क्रॉप इन्शुरन्स स्कीमची सुविधा मिळावी, असे सांगण्यात आले आहे.

हे पण वाचा : टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव? BCCI चा निर्णय काय?

बँकिंग ते आरोग्य; AI चे हे कोर्सेस करून कमवा लाखात पगार