Budget 2025: शत्रू होणार गारद ! भारत सरकारकडून, संरक्षण क्षेत्रासाठी 6.8 लाख कोटी

0
1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 (Budget 2025) सादर केला. या बजेटमध्ये युवक, महिला, शिक्षण आणि आरोग्य यांसह विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. संरक्षण क्षेत्रासाठी देखील यंदाच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी वाटप करण्यात आले आहे. यामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी एकूण 6.8 लाख कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.

संरक्षण क्षेत्राला बजेटमध्ये काय ? (Budget 2025)

संरक्षण क्षेत्रासाठी एकूण 6.8 लाख कोटी रुपयांचे बजेट जाहीर.
ही रक्कम देशाच्या एकूण GDP च्या 1.91% इतकी आहे.
6.8 लाख कोटी रुपयांपैकी 1.8 लाख कोटी रुपये केवळ भांडवली (कॅपिटल) बजेटसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
या निधीतून नवीन शस्त्रे, लढाऊ विमाने, युद्धनौका आणि इतर सैन्य साहित्य खरेदी केली जाणार आहे.

संरक्षण बजेटचे वाटप कसे करण्यात आले?

संरक्षण मंत्रालयासाठी एकूण 6.81 लाख कोटी रुपये वितरित, जे मागील (Budget 2025) वर्षाच्या तुलनेत 9.53% वाढले आहे.
सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी 1.80 लाख कोटी रुपयांची तरतूद.
देशांतर्गत संरक्षण उद्योगांकडून खरेदीसाठी 1.12 लाख कोटी रुपये राखीव.
संरक्षण निवृत्तीवेतन (पेंशन) योजनेसाठी 14% वाढ, एकूण 8,317 कोटी रुपये मंजूर.
संरक्षण संशोधन व विकास (DRDO) साठी 12% वाढ.
भारतीय तटरक्षक दल (ICG) च्या भांडवली खर्चात 43% वाढ.
सीमा रस्ते संघटनेसाठी (BRO) 7,146 कोटी रुपये वाटप.

मागील वर्षीच्या तुलनेत किती वाढ? (Budget 2025)

2024 मध्ये संरक्षण मंत्रालयाला 6.21 लाख कोटी रुपये मंजूर होते, जे 2023-24 च्या तुलनेत 4.79% जास्त होते.
2023 मध्ये हा निधी 5.94 लाख कोटी रुपये होता.
यंदाच्या 2025 बजेटमध्ये संरक्षण क्षेत्राला तब्बल 60,000 कोटी रुपयांची वाढ दिली गेली आहे.

इतर देशांच्या तुलनेत भारताचे संरक्षण बजेट किती?

चीनने 2024 मध्ये 225 अब्ज अमेरिकी डॉलर (अंदाजे 18.7 लाख कोटी रुपये) संरक्षण (Budget 2025) बजेटसाठी जाहीर केले.
पाकिस्तानने 2024 मध्ये 1.8 लाख कोटी रुपयांचे संरक्षण बजेट प्रस्तावित केले, जे त्यांच्या GDP च्या 1.7% इतके आहे.