Budget 2025: अर्थसंकल्पानंतर स्मार्टफोनसह इतर वस्तूंची खरेदी होणार स्वस्त? अर्थमंत्री घेणार मोठा निर्णय?

0
1
Budget 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Budget 2025 – अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्याकडून 1 फेब्रुवारी रोजी भारताचा 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. खासकरून टेक सेक्टर, स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळू शकतो. तर चला जाणून घेऊयात याबद्दल अधिक माहिती.

टेक कंपन्यांसाठी मोठा निर्णय –

स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे, कारण फोन निर्मात्या कंपन्यांनी सरकारकडून निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे. जर सरकार या मागणीला मान्यता देऊन निर्यात शुल्क कमी केले , तर स्मार्टफोनसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती कमी होऊ शकतात. यामुळे ग्राहकांना कमी किमतीत अत्याधुनिक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स मिळू शकतात.

वस्तूंच्या किंमती कमी होणार (Budget 2025)

स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती कमी होण्याबरोबरच, इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने सरकारकडून कंपोनेंट्सवर टॅक्स कमी करण्याची मागणी केली आहे. जर सरकार या मागणीला मान्यता देत, तर स्मार्ट टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सच्या किंमती कमी होऊ शकतात.

टेलीकॉम क्षेत्राला दिलासा –

टेलीकॉम कंपन्यांनी इंपोर्ट ड्युटी आणि लायसन्स फी कमी करण्याची मागणी केली आहे. या मागणीला मान्यता दिल्यास कंपन्यांना दिलासा मिळू शकतो, ज्यामुळे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अधिक गुंतवणूक केली आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा पुरवली.

सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे निर्णय –

बजेटमधून (Budget 2025) सामान्य वर्गासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. विशेषतः, ज्यांची वार्षिक कमाई 10 ते 15 लाख रुपयांदरम्यान आहे, त्यांना काही कर सवलती मिळू शकतात. याव्यतिरिक्त, इंफ्रास्ट्रक्चर क्षेत्रासाठी सरकार प्रोत्साहन देऊ शकते, विशेषतः हॉटेल, मॅन्युफॅक्चरिंग आणि रिअल इस्टेट क्षेत्रांना. रेल्वे, रस्ते बांधकाम, शहरी विकास आणि पॉवर क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केले जाऊ शकते.

AI वर अधिक लक्ष केंद्रित करणार –

अर्थसंकल्पात सरकार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) वर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत आहेत. या क्षेत्रात नवकल्पना आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळाल्यास भारताचे तंत्रज्ञान क्षेत्र आणखी प्रगती करू शकते. आर्थिक क्षेत्रात होणाऱ्या या बदलांमुळे सर्वसामान्य नागरिकांपासून उद्योग क्षेत्रापर्यंत प्रत्येकाला लाभ होईल, अशी आशा आहे. 1 फेब्रुवारी रोजी सादर होणारा अर्थसंकल्प देशाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

हे पण वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार चांदीच चांदी ; पगाराच्या 50% पेन्शन मिळणार

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज