Bull Fighting : दोन बैलांचे भांडण सोडवायला आलेल्या व्यक्तीसोबत घडला धक्कादायक प्रकार; व्हिडीओ पाहून व्हाल शॉक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bull Fighting) आजपर्यंत तुम्ही प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सोशल मीडियावर सतत प्राण्यांचे काही ना काही व्हिडीओ येतंच असतात. काही क्युट, काही आश्चर्यकारक तर काही हादरा देणारे असतात. असं म्हणतात एखाद्याच भांडण सुरु असेल तर तिसऱ्याने नाक खुपसायचे नसते. हा नियम प्राण्यांच्या बाबतीतसुद्धा लागू होतो असे म्हणायला हरकत नाही. कारण असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्ही हैराण व्हाल.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये रस्त्यावर दोन बैल भांडताना दिसत आहेत. तर त्यांच्या आजूबाजूला लोक नुसते उभे आहेत. अशातच एक माणूस मोठ्या हिंमतीने पुढे येऊन या बैलांचे भांडण संपवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. यानंतर जे होत ते पाहून तुम्हाला धक्काच लागेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील राजपुरा असल्याचे समजत आहे. रस्त्याच्या आजूबाजूने जाणाऱ्या लोकांपैकी कुणीतरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत रस्त्यावर दोन बैलांमध्ये जबरदस्त मारामारी होताना दिसत आहे. एकमेकांना ढुशा देऊन हे बैल भांडत आहेत. अगदी रस्त्याच्या मधोमध हे दोन्ही बैल जवळपास अर्धा तास भांडत होते असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हे बैल भांडत भांडत सुमारे २०० मीटरपर्यंत पोहोचले होते. त्यांची भांडण दुरूनच अनेक लोक पाहत होती. इतकंच काय तर सोशल मीडियावर टाकण्यासाठी अनेकजण व्हिडिओसुद्धा बनवत होते. पण कुणी पुढे जायची हिंमत करत नव्हते.

भांडण सोडवायला येणं पडलं महागात (Bull Fighting)

दरम्यान, तिथून जाणारी एक व्यक्ती संतापलेल्या बैलांना शांत करण्यासाठी आणि त्यांची झुंज थांबण्यासाठी पुढे येते. बैल शांत करण्यासाठी त्याने एका बैलाची शेपटी धरली आणि यामुळे त्याला मोठ्या परिणामाला सामोरे जावे लागले. हा व्यक्ती दुसऱ्या बैलाची शेपटी पकडणार त्याआधीच बैलाने रागात येऊन या व्यक्तीला उचलून जमिनीवर जोरात फेकले. यानंतर पुन्हा हे दोन्ही बैल भांडू लागले आणि राजपूर रस्त्याकडे धावत सुटले. NDTV India original या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे. (Bull Fighting)