Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात गुजरातमधन एक मोठा सकारात्मक अपडेट समोर आला आहे. नडियादजवळील एनएच-48 वर स्टील ब्रिजचा पहिला 100 मीटर लांबीचा भाग यशस्वीरीत्या लॉन्च करण्यात आला (Bullet Train) आहे. विशेष म्हणजे, हा पूल ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आला आहे.
एनएच-48 हा दिल्ली, मुंबई आणि चेन्नई यासारख्या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा अतिशय वर्दळीचा महामार्ग आहे. बुलेट ट्रेनसाठी तयार करण्यात आलेल्या या स्टील ब्रिजमध्ये दोन 100 मीटर लांबीचे भाग आहेत. यापैकी पहिला भाग (Bullet Train) आता पूर्ण झाला आहे, आणि दुसऱ्या भागाचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे.
ब्रिजची वैशिष्ट्ये (Bullet Train)
या स्टील ब्रिजची उंची 14.6 मीटर, रुंदी 14.3 मीटर असून वजन जवळपास 1414 मेट्रिक टन आहे. हा ब्रिज उत्तर प्रदेशातील हापुड़ येथील सालासर फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आला आहे. हा पूल तब्बल 100 वर्षांपर्यंत टिकण्यासाठी डिझाइन करण्यात (Bullet Train) आला आहे. यामध्ये 57,200 मजबूत बोल्ट, विशेष प्रकारची C5 पेंटिंग आणि इलास्टोमेरिक बेअरिंग्सचा वापर करण्यात आला आहे. पूल उभारणीसाठी जमीनीपासून 14.9 मीटर उंच अस्थायी स्ट्रक्चर्सवर पूल ठेवून सेमी-ऑटोमॅटिक जॅक्सच्या साहाय्याने तो सरकवण्यात आला.
सात पूल आधीच पूर्ण (Bullet Train)
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी एकूण 28 स्टील ब्रिज उभारण्यात येणार आहेत, त्यापैकी 11 महाराष्ट्रात आणि 17 गुजरातमध्ये असतील. गुजरातमध्ये आतापर्यंत 7 स्टील ब्रिज पूर्ण झाले आहेत, जे रेल्वे, डीएफसीसी मार्ग आणि प्रमुख महामार्गांवर उभारले गेले आहेत.
हा प्रकल्प केवळ बुलेट ट्रेनच्या द्रुतगती प्रवासासाठी महत्त्वाचा नाही, तर गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठीही मोलाची भूमिका बजावणार आहे. यामुळे भारतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून ‘मेक इन इंडिया’ला बळकट करणारा हा उत्तम नमुना ठरत आहे.
भविष्यातील सोयी (Bullet Train)
या प्रकल्पामुळे मुंबई-अहमदाबाद प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून प्रवाशांना अधिक आरामदायक आणि जलद सेवा मिळणार आहे.