Bullet Train : बुलेट ट्रेनसाठी खडीविरहित खास पद्धतीचे ट्रॅक ;मेक इन इंडियाचे शानदार उदाहरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bullet Train : भारतात मोठ मोठी विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील मोदी सरकारचा एक महत्तवाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन या ट्रेनची कामे मोठ्या झपाट्याने सुरु आहेत. याच्याच संबंधीचा एक व्हिडीओ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया एक्स वर शेअर केला आहे. बुलेट ट्रेन (Bullet Train) साठी वैशिट्यपूर्ण ट्रॅकची बांधणी करण्यात येणार आहे. याच बॅलेस्टलेस ट्रॅकची माहिती सांगणारा व्हिडीओ मंत्री वैष्णव यांनी शेअर केला आहे.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे की ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत बनवलेले (Bullet Train) हे ट्रॅक बॅलेस्टलेस आहेत, म्हणजेच असे ट्रॅक, ज्यांना हाय-स्पीड ट्रेनचे वजन सहन करण्यासाठी ट्रॅकमध्ये खडी आणि काँक्रीटच्या कोनांची आवश्यकता नसते. या ट्रॅकचा वेग ताशी 320 किमी असेल. यापैकी 153 किलोमीटरच्या व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय 295.5 किमी पीअरचे कामही पूर्ण झाले आहे.

काय आहे व्हिडीओ ? (Bullet Train)

व्हिडिओमध्ये सांगितले आहे की, जे-स्लॅब बॅलास्टलेस ट्रॅक सिस्टम – वापरली जात आहे. या ट्रॅक सिस्टीममध्ये प्रामुख्याने चार भाग आहेत. आरसी ट्रॅक बेड हे प्री-कास्ट स्लॅब्स आणि फास्टनर्ससह रेलसह (Bullet Train) सिमेंट-डामर आणि वाया डक्टवर एक थर आहे. व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की देशात दोन ठिकाणी गुजरातच्या आनंद आणि किममध्ये प्री-कास्ट आरसी ट्रॅक स्लॅब तयार केले जात आहेत. सुमारे 35 हजार मेट्रिक टन रेलची आवक झाली आहे. बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे.