Bullet train : केंद्र सरकारचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट म्हणून मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट कडे पाहिलं जातं. मात्र बुलेट ट्रेन प्रोजेक्ट संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अहमदाबाद मध्ये साबरमती बुलेट ट्रेनच्या (Bullet train) स्टेशनचे बांधकाम सुरू आहे आणि या स्टेशनवर आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे.
14 अग्निशामक दलाच्या गाड्या झाल्या होत्या दाखल
मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अग्नीशामक दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाने दोन तासात ही आग आटोक्यात आणली. बुलेट ट्रेन (Bullet train) स्टेशनला लागलेली आग विझवण्यासाठी तब्बल 14 अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या दोन तासात अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवता आलं. दरम्यान याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या स्टेशनचा एक भाग आगीच्या भक्षस्थानी पडल्याचं दिसून येत आहे.
नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेड (Bullet train) कडून या घटनेची माहिती देण्यात आली. बांधकाम सुरू असलेल्या स्टेशनच्या छताच्या शटरिंग ला आग लागली वेल्डिंग स्पार्क मुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही घटनास्थळी अधिकारी सुद्धा दाखल झाले आहेत.
या स्टेशन्सचा समावेश (Bullet train)
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Bullet train) मार्गाची एकूण लांबी 508 किलोमीटर आहे. या मार्गावर महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर आणि गुजरातमध्ये वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती असे एकूण 12 स्टेशन प्रस्तावित आहेत. सुमारे 1.08 लाख कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा मुख्य आकर्षण समुद्राखालील 21 किलोमीटर लांब भुयारी मार्ग आहे.