bullet train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) गुजरातमधून मोठी बातमी समोर आली आहे. नेशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) बुधवारी जाहीर केले की गुजरातमधील चार रेल्वे ट्रॅकवर 100 मीटर लांब स्टील गर्डर यशस्वीरित्या बांधण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 508 किलोमीटर लांब कॉरिडॉरच्या गुजरात भागामध्ये उभारल्या जाणाऱ्या 17 संरचनांपैकी हा सहावा स्टील पूल आहे.
NHSRCL ने काय माहिती दिली? (bullet train)
NHSRCL ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की पश्चिम रेल्वेच्या दोन ट्रॅकवर स्टीलचे संरचनात्मक काम करण्यात आले. हे काम सूरत जिल्ह्यातील किम आणि सायन गावांच्या दरम्यानच्या समर्पित माल वाहतूक कॉरिडॉर (DFC) भागात करण्यात आले. या 100 मीटर लांब स्टील गर्डरची रुंदी 14.3 मीटर असून त्याचे वजन 1,432 मेट्रिक टन आहे.
सहावा स्टील पूल (bullet train)
या गर्डरचे उत्पादन भुज येथील एका वर्कशॉपमध्ये करण्यात आले आणि नंतर ते रस्तेमार्गाने बांधकाम स्थळी पोहोचवले गेले. 508 किलोमीटर लांब कॉरिडॉरच्या गुजरात भागामध्ये तयार होणाऱ्या 17 संरचनांपैकी हा सहावा स्टील पूल आहे. याशिवाय, बांधकाम स्थळी (bullet train) रेल्वे ट्रॅकच्या जवळ असलेल्या सिंचन कालव्यावर 60 मीटर लांब आणखी एक स्टील पूल बांधण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
बुलेट ट्रेन मार्गावर किती स्टेशन?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाची एकूण लांबी 508 किलोमीटर आहे. या मार्गावर महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार, बोईसर आणि गुजरातमध्ये वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती असे एकूण 12 स्टेशन प्रस्तावित आहेत. सुमारे 1.08 लाख कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा मुख्य आकर्षण समुद्राखालील 21 किलोमीटर लांब भुयारी मार्ग आहे.