Burn Mouth Remedy : अनेक वेळा घाईगडबडीत , काही गरम अन्न किंवा चहा कॉफी अशी पेय पिल्यानंतर जिभेवर किंवा तोंडावर चांगलेच चटके बसतात. हा त्रास काही एका दिवसात कमी होत नाही तर जवळपास तीन चार दिवस त्रास सहन करावा लागतो. शिवाय त्यानंतर जेव्हा आपण दुसरा एखादा पदार्थ खातो तेव्हा पोळल्यामुळे त्याची चवही लागत नाही. जीभ पोळणे, किंवा तोंड येणे (माऊथ अल्सर) अशा (Burn Mouth Remedy) समस्यांचा तुम्हालाही वारंवार सामना करावा लागत असेल तर आम्ही तुम्हाला आजच्या लेखात काय घरगुती उपाय सांगणार आहोत.
खरेतर, मेडिकल स्टोअर्समधून हे समस्या सोडवण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत मात्र , आजच्या लेखात आपण अशा काही घरगुती टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
कोरफड (Burn Mouth Remedy)
कोरफडमध्ये अनेक जखमा बरे करण्याचे गुणधर्म आहेत, जे तुम्ही थेट तुमच्या अल्सरवर (Burn Mouth Remedy) वापरू शकता. फोडांवर लावताना सुरुवातीला तुम्हाला थोडी जळजळ जाणवू शकते, परंतु नंतर तुम्हाला त्यातून आराम मिळू लागेल आणि फोड लवकर बरे होऊ लागतील.
मध
जीभ भाजल्यानंतर (Burn Mouth Remedy) तयार होणाऱ्या फोडांवर किंवा जखमांवर उपचार करण्यासाठी देखील मध लावता येते. मधामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म शक्य तितक्या लवकर सूज आणि लालसरपणा दूर करण्यास मदत करतात. जीभ आणि तोंडातील व्रणांवर किमान १५ मिनिटे मध लावा आणि तोंड खालच्या बाजूला ठेवा जेणेकरून पाणी वाहत राहील. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्हाला काही काळ जळजळ होऊ शकते, परंतु नंतर तुम्हाला आराम मिळेल.
बर्फाने शेका
जिभेच्या जळलेल्या भागावर (Burn Mouth Remedy) बर्फाच्या तुकड्याने शेका . तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बर्फाच्या तुकड्यांऐवजी आईस्क्रीम म्हणजेच कुल्फी देखील वापरू शकता. बर्फाचे तुकडे स्वच्छ पिण्याच्या पाण्याने भरा आणि हळू हळू जिभेवर लावा. असे केल्याने केवळ थंडावाच मिळत नाही तर फोडही लवकर बरे होऊ लागतात.




