Business Idea : घरबसल्या सुरु करा ‘हा; बिझनेस ; मिळावा बक्कळ कमाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Business Idea : नोकरी असली तरी आजकाल प्रत्येकाला वेगळ्या आणि नवीन पद्धतीने व्यवसाय करायचा असतो. तुम्हालाही असेच काहीतरी वाटत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी अशीच बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. आज आम्ही ज्या व्यवसायाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत सध्या या व्यवसायामध्ये अनेकजणांना फायदा होत आहे. एक फायदेशीर बिझनेस (Business Idea) म्हणजे टी-शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय

सध्या बाजारात विविध प्रकारच्या टी-शर्टला खूप मागणी आहे. आजकाल, सर्व प्रकारच्या सेवा पुरवठादार, कार्यक्रम, रेस्टॉरंट्स, शोरूम इत्यादींच्या कर्मचाऱ्यांमध्ये स्वतःचे प्रिंट केलेले टी-शर्ट घालण्याचा ट्रेंड (Business Idea) आहे. त्याच वेळी, ट्रेंडिंग मीम्सवर टी-शर्ट देखील बनवले जाऊ लागले आहेत, याचा अर्थ तुम्हाला या व्यवसायात नफा मिळणार आहे.

कसा सुरु कराल व्यवसाय ? (Business Idea)

अगदी कमी भांडवलात तुम्ही घरबसल्या टी-शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला सुरुवातीला सुमारे 70 हजार रुपये गुंतवावे लागतील. आता तुम्ही म्हणाल यातून किती रुपयांची कमाई होऊ शकेल तर आपण दरमहा 30 ते 40 हजार रुपये यातून कमवू शकता. टी-शर्ट प्रिंटिंगसाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टी म्हणजे प्रिंटर, हीट प्रेस, संगणक, कागद आणि कच्चा माल म्हणून टी-शर्ट. सर्वात स्वस्त मशीन मॅन्युअल आहे, ज्यामधून एक टी-शर्ट 1 मिनिटात (Business Idea) तयार केला जाऊ शकतो.

किती येतो खर्च ?

या व्यवसायाच्या सुरूवातीस, तुम्हाला एक टी-शर्ट प्रिंटिंग मशीन खरेदी करावी लागेल, ज्याची किंमत सुमारे 50 हजार रुपये आहे. तर छपाईसाठी सामान्य दर्जाच्या पांढऱ्या टी-शर्टची किंमत सुमारे 120 रुपये आहे आणि त्याची छपाईची किंमत रुपये 1 ते 10 च्या दरम्यान आहे. जर तुम्हाला थोडे चांगले प्रिंटिंग हवे असेल तर त्याची किंमत 20 ते 30 रुपये आहे. त्याच वेळी, तुम्ही ते किमान 200 ते 250 रुपयांना विकू (Business Idea) शकता. तुम्ही थेट विक्री केल्यास, तुम्हाला एका टी-शर्टवर किमान 50 टक्के नफा मिळेल.

विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची मदत

तुम्ही स्वत: छापलेले टी-शर्टही ऑनलाइन विकू शकता. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याची किंमत खूपच कमी आहे. यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्रँड तयार करावा लागेल. त्यानंतर तुम्ही ते कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विकू शकता. एकदा हा व्यवसाय सुरू झाला की, तुम्ही त्याचा आणखी विस्तार करू शकता. तुम्ही चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अधिक प्रमाणात टी-शर्ट प्रिंटिंगसाठी अधिक महाग मशीन खरेदी (Business Idea) करू शकता.