सुरु करा नव्या जमान्याचा सुपरहिट बिझनेस ; प्रतिमहिना मिळतील बक्कळ पैसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक लोकांना कमी पगार असल्यामुळे पैशाची चणचण भासत असते. हि आर्थिक चणचण भरून काढायची असेल , तर आज आम्ही तुम्हाला एक असा व्यवसाय सांगणार आहोत , ज्यामुळे तुम्ही कमी पैशात जास्त कमाई करू शकता. या व्यवसायाला कमी गुंतवणूक लागते , त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही हा व्यवसाय सुरु करू शकतो. आजकाल फॅशन आणि तंत्रज्ञानाच्या युगात टी शर्ट या कपड्याला प्रचंड मागणी असल्यामुळे तुमच्यासाठी टी शर्ट प्रिंटिंगचा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो .

किती गुंतवणूक करावी लागेल –

टी शर्ट प्रिंटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला साधारण 70000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये प्रिंटर, हीट प्रेस, संगणक, कागद आणि टी शर्ट या आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचा असेल, तर 2 लाखांपासून ते 6 लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागू शकते. हि केलेली गुंतवणूक तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देईल. तसेच ई कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून , हा ब्रँड Amazon, Flipkart यांसारख्या प्लॅटफॉर्मवर विकू शकता. या प्लॅटफॉर्ममुळे व्यवसायाला अधिक चालना मिळेल.

साधारण 50% नफा –

साधारण प्रिंटिंग मशीनची किंमत 50000 रु असते. व्हाइट टी-शर्टवर सामान्य प्रिंटिंग खर्च 1 ते 10 रुपये पर्यंत होतो. उच्च दर्जाच्या प्रिंटिंगसाठी 20 ते 30 रुपये खर्च येतो. हा टी-शर्ट्स तुम्ही बाजारात 200 ते 250 किंमतीला विकू शकता. यावर तुम्हाला एका टी-शर्टवर साधारण 50% नफा कमावता येतो. जर तुम्ही योग्य नियोजन आणि मेहनत केली, तर महिन्याला 40000 ते 50000 सहज कमवू शकता. त्यामुळे कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय तुम्हाला चांगले उत्पन्न देऊ शकतो. टी शर्ट प्रिंटिंग हा कमी भांडवलात सुरू होणारा आणि चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय ठरू शकतो. योग्य कल्पना, डिझाइन्स आणि मार्केटिंगच्या मदतीने तुम्ही तुमचा स्वतःचा ब्रँड तयार करून मोठ्या यशाकडे वाटचाल करू शकता.