हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Business Idea) दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची इतकी घाई असते की, त्यांना धड नाश्ता सुद्धा करता येत नाही. अशावेळी ब्रेड बराच कामाला येतो. ब्रेड बटर, ब्रेड जॅम, ब्रेड ऑम्लेट किंवा नुसता ब्रेड टोस्ट जरी असला तरी पटकन खाऊन पोटाला बराच आधार मिळतो. त्यामुळे सध्याच्या जगात ब्रेडला मोठी मागणी आहे. अशावेळी एखाद्या सुपीक डोक्यात सगळ्यात आधी व्यवसायाची कल्पना येऊ शकते. कारण ब्रेड हा असा पदार्थ आहे जो डोळ्यांना दिसताच विकत घेतला जातो.
आजकाल ब्रेडचा वाढता खप व्यावसायिक दृष्टिकोनातून फायदेशीर गोष्ट ठरत आहे. कारण ब्रेडच्या माध्यमातून अगदी झटपट विविध पदार्थ तयार करता येतात. (Business Idea) त्यामुळे बऱ्याच घरात सर्रास ब्रेड खाल्ला जातो. त्यामुळे साहजिकपणे ब्रेडची विक्री मोठ्या प्रमाणात होते. म्हणूनच आज आपण ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसबाबत चर्चा करणार आहोत. यासाठी किती गुंतवणूक लागेल? ते जमीन, इमारत, मशिन, वीज- पाण्याची सुविधा आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता अशा विविध मात्र महत्वाच्या गोष्टींविषयी आपण माहिती घेणार आहोत.
बिझनेस प्लॅन महत्वाचा (Business Idea)
कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्याआधी तुमच्याकडे एक चांगली कल्पना आणि नियोजन हवे. अर्थात बिझनेस करण्यासाठी बिझनेस प्लॅन असायला हवा. आता ब्रेडचा व्यवसाय करायचा असेल तर यासाठी तुम्हाला काय काय गरजेचे आहे? याचा आधी विचार करा. जसे की, ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग करायची म्हणजे तुम्हाला एक उत्तम गुंतवणूक हवी. यानंतर महत्वाचे म्हणजे जागा. त्यानंतर ब्रेड बनवण्यासाठी लागणारी यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता लक्षात घेणे. यानुसार एक नीती आखणे आणि कामाला सुरुवात करणे.
गुंतवणुकीची गरज
जर तुम्ही ब्रेड बनवण्याच्या व्यवसाय हा छोट्या स्केलवर करायचा विचार करत असाल तर तुम्हाला फार गुंतवणूक करण्याची गरज नाही. (Business Idea) मात्र मोठ्या स्केलवर हा व्यवसाय करण्याचा तुमचा मानस असेल तर मात्र तुम्हाला अधिक गुंतवणुकीची गरज पडेल. सर्वसामान्यपणे हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी ५ लाख रुपये तरी गुंतवावे लागतील. याशिवाय १००० चौरस फूट जागेची गरज लागेल. या जागेत तुम्ही ब्रेड तयार करण्यासाठी कारखाना उभारू शकता. या व्यवसायासाठी लागणार निधी जमा करायला तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेची मदत घेऊ शकता.
व्यवसायासाठी नोंदणी आवश्यक
ब्रेड हा एक अन्न पदार्थ आहे. अर्थात हे एक अन्न उत्पादन आहे. (Business Idea) त्यामुळे फूड इंडस्ट्रीच्या नियमानुसार, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला FSSAI कडून फूड बिझनेस ऑपरेशन परवान्यासाठी अर्ज करावा लागेल.
इतकी होईल कमाई
ब्रेडच्या व्यवसायातून होणाऱ्या फायद्याविषयी बोलायचं झालं तर, ब्रेडच्या सामान्य पॅकेटची किंमत ४० ते ६० रुपये इतकी आहे. तर ब्रेड बनवण्यासाठी त्याहून बराच कमी खर्च होतो. (Business Idea) अर्थात तुम्ही एकावेळी अधिक उत्पादन केल्यास महिन्याला किमान लाखो रुपयांची कमाई करू शकता.
जाहिरात करावी लागेल
कोणताही व्यवसाय करताना मार्केटिंग स्ट्रॅटेजी आखावी लागते. आपण तयार करत असलेले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरात करणे आवश्यक असते. यातून आकर्षकरित्या आपल्या उत्पादनाची माहिती द्यावी. तसेच आसपासच्या स्थानिक बाजारपेठेला लक्ष्य करावे. यामुळे तुमच्या ब्रेडची मागणी ग्राहकांमध्ये वाढत जाईल. (Business Idea)