हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीचा सण तोंडावर आला असून , बाजारात मोठयाप्रमाणात गर्दी पाहण्यास मिळत आहे. अगदी छोट्या किराणा मालापासून ते गाडी घेण्याच्या कामापर्यंत खरेदी केली जाते. या शुभ मुहूर्तावर अनेक नवीन कामांची सुरुवात केली जाते. या हंगामात लोकांचा कल हा खरेदी करण्यावर असतो . पण आर्थिक अडचणीमुळे काही लोकांना सामान घेणे शक्य नसते . त्यामुळे अशा सणासुदीच्या काळात झोमॅटोच्या मालकीची किंक कॉमर्स कंपनी ब्लिंकिटने ग्राहकांसाठी एका नव्या ऑफरची घोषणा केली आहे. ज्यामुळे ग्राहक EMI वरून सामानाची खरेदी करून शकतात. अशा लोकांसाठी ब्लिंकिटची ही योजना खूपच फायदेशीर ठरणार आहे.
ब्लिंकिट कंपनी
ब्लिंकिट ही एक किंक कॉमर्स कंपनी आहे, जी किराणा सामानापासून महागड्या वस्तूंपर्यंत सर्वकाही घरपोच करते . आयफोन 16 काही मिनिटांत घरपोच करून चर्चेत आलेली ही कंपनी सध्या बाजारात असलेल्या विविध स्पर्धकांशी स्पर्धा करत आहे. या स्पर्धेत आघाडी मिळवण्यासाठी ब्लिंकिटने ईएमआय सुविधा सादर केली आहे. या ऑफरची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी अलबिंदर धिंडसा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे केली आहे. या योजनेमुळे लोकांना परवडणारी क्षमता प्रदान केली जाईल. त्यामुळे लोकांना आर्थिक धीर दिला जाईल.
ईएमआयची सुविधा
या सुविधेचा फायदा तुम्हाला 2999 रुपयावरील सर्व ऑर्डरवर मिळणार आहे. पण या योजनेत सोन्या ,चांदीची नाणी खरेदी करता येणार नाहीत. तसेच नो कॉस्ट ईएमआयसोबत 15 टक्के वार्षिक व्याजदराचा पर्याय देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदी करताना पैशाची चिंता करण्याची गरज नाही . ब्लिंकिटची मूळ कंपनी झोमॅटो, इक्विटी शेअर्सच्या कॅलिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे (QIP) 8500 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीच्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, झोमॅटोने पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून हे पैसे उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.