हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधुनिक स्मार्टफोन तंत्रज्ञानामुळे कॉल हिस्ट्री काढणे आता खूप सोपे झाले आहे. पूर्वी कॉल रेकॉर्ड मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागत होती , पण आता Jio सिम कार्ड वापरकर्त्यांना त्यांची संपूर्ण कॉल हिस्ट्री काही मिनिटांत मिळवता येणार आहे . पण ती कॉल हिस्ट्री कशी मिळवायची असा अनेकांना प्रश्न पडला असेल. तर Jio वापरकर्त्यांसाठी MyJio अँपद्वारे हि कॉल हिस्ट्री काढता येणार आहे.
MyJio अँपद्वारे कॉल हिस्ट्री –
प्रथम, तुमच्या स्मार्टफोनमध्ये MyJio अँप ओपन करा.
जर तुम्ही या आधी लॉगिन केले नसेल, तर मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या ‘प्रोफाइल आयकॉन’वर क्लिक करा.
‘Mobile’ आणि नंतर ‘My Usage’ वर क्लिक करा.
‘Calls’ सेक्शन निवडा
या प्रोसिजर नंतर तुम्हाला संपूर्ण कॉल हिस्ट्री पाहता येणार आहे.
MyJio अँपकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवा –
जे लोक MyJio अँप वापरतात त्यांच्यासाठी कॉल हिस्ट्री डाउनलोड करण्याची सुविधा देखील आहे. यासाठी तुम्ही 7 दिवस, 15 दिवस, 30 दिवस किंवा 180 दिवसांची कस्टम डेट रेंज निवडू शकता. डाउनलोड केलेले स्टेटमेंट तुमच्या ईमेल पत्त्यावर पाठवले जाईल, ज्यात कॉलचा कालावधी, कॉल केलेले नंबर आणि इतर आवश्यक माहिती दिलेली असते. Jio वापरकर्त्यांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे, विशेषतः त्यांच्यासाठी ज्यांना कॉल्स ट्रॅक करायचे असतात किंवा जुन्या कॉल्सची माहिती पाहायची आहे. MyJio अँपच्या माध्यमातून कॉल हिस्ट्रीची पूर्ण माहिती मिळते. त्यामुळे हे अँप लोकांसाठी फायदेशीर आहे.