Car Washing Tips: कार धुताना 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा ; नाहीतर होईल लाखोंचं नुकसान

0
1
Car Washing Tips
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Car Washing Tips नवीन कार घेतल्यानंतर त्या गाडीचा मालक खूप काळजी घेत असतो. त्याचसोबत ती खराब होऊ नये यासाठी वारंवार धुतो, पण ती सतत धुतल्यामुळे तिच्या नको असलेल्या भागात पाणी जाते आणि कालांतराने ती पूर्णपणे खराब होते. गाडीच्या नाजूक भागात पाणी गेले की, त्यामुळे त्याच्या वाईट परिणाम कार्यक्षमतेवर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आज आपण गाडीच्या कोणत्या भागात पाणी जायला नको , याची माहिती पाहणार आहोत . तर चला याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये पाणी –

इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये पाणी शिरल्याने वाहनाच्या सर्व इलेक्ट्रॉनिक्सचे नुकसान होऊ शकते. हे इंजिन सुरू न होणे आणि बॅटरी खराब होण्यास कारणीभूत ठरू शकते.

एसी व्हेंट्स आणि एअर इनटेकमध्ये पाणी शिरल्यास –

एसी व्हेंट्स किंवा एअर इनटेकमध्ये पाणी शिरल्यास, इंजिन आणि एसी सिस्टमचे नुकसान होऊ शकते. यामुळे इंजिनची कार्यक्षमता कमी होण्यासोबत, एसीचे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते.

डोअर पॅनेल्स आणि विंडो डिटेल्स –

कारच्या दरवाज्याजवळ पाणी शिरल्याने त्याची फिनिशिंग खराब होऊ शकते आणि गंजण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

ब्रेक आणि व्हील हब (Car Washing Tips)

ब्रेक आणि व्हील हबमध्ये पाणी शिरल्याने गंज निर्माण होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे ब्रेक्सच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

इंटिरियर्स –

कारच्या इंटिरियर्समध्ये पाणी जाऊ नये. विशेषत: इलेक्ट्रिक कारमध्ये. तसेच पाणी सीटवर पडल्यास इलेक्ट्रिकल पार्ट्सचे नुकसान होऊ शकते.

एक्झॉस्ट पाईप –

एक्झॉस्ट पाईपमध्ये पाणी शिरल्यास गंज येऊ शकतो आणि एक्झॉस्ट सिस्टमच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे इंजिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते.

गाडी धुताना कोणती काळजी घावी –

कार धुताना (Car Washing Tips) ओल्या कापडाचा वापर करणे गरजेचे आहे .
गाडी स्वच्छ करण्यासाठी विशेष क्लीन्सर वापरा.
इलेक्ट्रिकल पार्ट्सच्या आसपास पाणी वापरणे टाळा, आणि त्यासाठी खास क्लीन्सरचा वापर करा.
विशेषतः इंजिन आणि इलेक्ट्रिकल भागांवर थेट स्प्रेमद्वारे पाणी ओतू नका.
त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या गाडीला दीर्घकालीन कार्यक्षम आणि सुरक्षित ठेवायचं असेल, तर पाणी वापरताना सावधगिरी बाळगा.