भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘फ्युचर वॉर्स अँड वॉरफेअर’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होत पाकिस्तानविरोधातील एका गुप्त ऑपरेशनविषयी धक्कादायक माहिती दिली. त्यांनी उघड केलं की पाकिस्तानने भारताला ४८ तासांत गुडघ्यावर आणण्याचा कट रचला होता, पण केवळ ८ तासांतच त्यांनी सरेंडर केलं
ऑपरेशन ‘सिंदूर’चं गुप्त पर्व
१० मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने भारतावर दबाव टाकण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी विविध हल्ले सुरू केले होते. जनरल चौहान यांनी सांगितले की, “त्यांचा हेतू भारताला ४८ तासांत गुडघ्यावर आणण्याचा होता. मात्र भारताने केवळ दहशतवादी तळांवर अचूक कारवाई करत त्यांच्या योजनेला छेद दिला.”
पाकिस्तानचं तात्काळ सरेंडर
CDS म्हणाले, “सुरुवातीला पाकिस्तानकडून ही कारवाई ४८ तास चालवण्याचा विचार होता. पण केवळ ८ तासांमध्येच त्यांनी फोन करून चर्चेची मागणी केली.” पाकिस्तानला कळून चुकलं की, जर युद्ध झालंच, तर पराभव अटळ आहे.
आतंकवाद हे युद्धाचं योग्य माध्यम नाही
CDS अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले की, “ही संपूर्ण झुंज पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झाली होती. पण आतंकवाद हा युद्धाचा योग्य मार्ग नाही. त्याला कोणतेही स्पष्ट नियम नाहीत. आमचा शत्रू भारताला इजा पोहोचवू इच्छित होता, मात्र तो यात पूर्णपणे अपयशी ठरला.”
भारताने आखली नव्या युद्धरेषा
चौहान यांनी युद्धाच्या तत्त्वज्ञानावर भाष्य करत सांगितले की, “युद्ध हे जितकं जुनं आहे, तितकीच जुनी मानवी संस्कृती आहे. त्यात हिंसा आणि त्या हिंसेमागे असलेली राजकीय भूमिका हे दोन मुख्य घटक असतात. भारताने आताच्या संघर्षात एक नवी युद्धरेषा आखली आहे जी आतंकवादाच्या विरोधात स्पष्ट आणि निर्णायक आहे.”
ही माहिती म्हणजे भारताच्या सैन्यदलाच्या अचूक रणनीती आणि सर्जनशील कारवाईचं जिवंत उदाहरणआहे. पाकिस्तानच्या कटांना धुळीला मिळवत, भारताने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की संविधानिक शांततेच्या आधारावर उभा असलेला देश कधीही झुकत नाही, पण धोका आला तर झुकूही देत नाही.




