केंद्राकडून महाराष्ट्राला मोठी भेट ! बनणार 2 नवे रेल्वे मार्ग ; शेतकऱ्यांना फायदा, पर्यटनालाही चालना

new railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रेल्वे विभागाकडून महाराष्ट्रासाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने रेल्वे विभागाच्या माध्यमातून तीन मोठ्या रेल्वे मार्गासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या तीन मार्गापैकी महाराष्ट्रातल्या दोन मार्गांचा समावेश असल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसाठी ही आनंदाची बातमी असून याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. आता हे दोन्ही रेल्वे मार्ग कोणत्या भागातून जाणार आहे त्यामुळे कोणत्या भागाला अधिक फायदा होणार आहेत जाणून घेऊयात…

‘या’ रेल्वे मार्गांचा समावेश

मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आणि रेल्वे विभाग या दोघांच्या माध्यमातून तीन रेल्वे मार्गांना मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पामध्ये जळगाव मनमाड चौथा रेल्वे मार्ग 160 किलोमीटर, भुसावळ ते खंडवा तिसऱ्या आणि चौथा रेल्वे मार्ग 131 किलोमीटर आणि प्रयागराज ते माणिकपूर असा तिसरा रेल्वे मार्ग 84 किलोमीटरचा आहे. याबाबतची माहिती रेल्वेचे व्यवस्थापक धर्मेंद्र मीना यांनी भुसावळ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

एवढेच नाही तर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 7,927 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग मंजूर झाल्यामुळे या मार्गावरून होणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही वाहतुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे प्रवासी संख्या देखील वाढणार आहे. या कामामुळे स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळणार असून पर्यटनावर सुद्धा याचा चांगला परिणाम होणार आहे अशी माहिती यावेळी बोलताना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मेंद्र मीना यांनी दिली. मनमाड ते जळगावदरम्यान 160 किमी लांबीची चौथी रेल्वे लाइन टाकली जाणार आहे. यावर 2773 कोटी रुपये खर्च येणार आहे. भुसावळ ते खंडवा या मार्गावर 131 किमी लांबीची तिसरी आणि चौथी रेल्वे लाइन टाकली जाणार आहे. यावर 3514 कोटी रुपये खर्च येणार आहे.

पर्यटनाला मिळणार चालना

या प्रकल्पामुळं महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळ असलेले अंजठा-एलोरा, देवगिरी किल्ला, रेवा किल्ला, यावळ अभयारण्य, केवोती धबधबा, असीरगड किल्ला यासारख्या विविध आकर्षणाचे केंद्र असलेल्या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याचा विचार आहे, असंही सरकारने नमूद केलं आहे.

कनेक्टिव्हीटी वाढवणार

दरम्यान, हा प्रस्तावित प्रकल्प मुंबई-प्रयागराज-वाराणसी मार्गावर अतिरिक्त प्रवासी गाड्या चालवण्यासाठी कनेक्टिव्हीटी वाढवणार आहे. तसंच, याचा फायदा नाशिक (त्र्यंबकेश्वर), खंडवा (ओंकारेश्वर), आणि वाराणसी (काशी विश्वनाथ) येथील ज्योतिर्लिंगांना जाणाऱ्या यात्रेकरूंना तर होईलच पण त्याचबरोबर प्रयागराज, चित्रकूट, गया आणि शिर्डी येथील धार्मिक स्थळांवरील पर्यटनदेखील वाढणार आहे, असं सरकारने सांगितले.