Chardham Yatra 2025 : उत्तराखंडमधील पवित्र चारधाम यात्रा आजपासून (बुधवार) सुरू झाली आहे. ही यात्रा सुरक्षित व नियोजित होण्यासाठी राज्य सरकारने काही नियम अनिवार्य केले आहेत. यामध्ये सर्व वाहनचालक व यात्रेकरूंना ‘ग्रीन कार्ड’ आणि ‘ट्रिप कार्ड’ घेणे बंधनकारक आहे. या कार्डशिवाय कोणतेही वाहन चारधाम यात्रेसाठी परवानगीशिवाय (Chardham Yatra 2025) जाऊ शकणार नाही.
यात्रेस येण्यापूर्वी यात्रेकरूंना पर्यटन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर (https://registrationandtouristcare.uk.gov.in) नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ग्रीन कार्डसाठी greencard.uk.gov.in या पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक ती माहिती भरावी लागेल. ग्रीन कार्ड एआरटीओ कार्यालयातून बनवले जाऊ शकते.
चारधाम यात्रा नोडल अधिकारी संदीप सैनी यांच्या माहितीनुसार, इतर राज्यांतून येणाऱ्या वाहनांना ग्रीन कार्डसह पर्वतीय मार्गांसाठी विशेष परवाना आवश्यक आहे. चालकाकडे वाहनातील प्रवाश्यांची सूची, प्रवाशांचे मोबाइल क्रमांक, हॉटेल किंवा धर्मशाळेचे (Chardham Yatra 2025) नाव व फोन नंबर असणे बंधनकारक आहे. तसेच उत्तराखंडमध्ये प्रवेश करताना टोल प्लाझा रिसीट व तिथून प्राप्त मेसेज दाखवणेही आवश्यक आहे.
चारधाम यात्रेचे महत्व काय आहे? (Chardham Yatra 2025)
चारधाम यात्रा म्हणजे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री ही चार प्रमुख तीर्थस्थळे एकत्रितपणे भेट देण्याची यात्रा. हिंदू धर्मामध्ये या यात्रेला अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की, या चारधामांची यात्रा केल्याने जीवनातील (Chardham Yatra 2025) पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते. हजारो वर्षांपासून ही परंपरा चालू आहे आणि दरवर्षी लाखो श्रद्धाळू या यात्रेमध्ये सहभागी होतात.




