ChatGPT च्या ‘या’ नव्या फीचर्सची मुख्यमंत्र्यांपासून मोदींपर्यंत, सर्वांमध्ये चर्चा

AI
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोशल मीडियावर घिब्ली इमेजेसने धुमाकूळ घातला आहे. ओपन एआय चॅटजीपीटीचे (ChatGPT) ’40 इमेज जनरेशन’ हे फिचर आल्यानंतर यूजर्सकडून त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता घिब्ली इमेजेस (Ghibli Images) तयार करुन सोशल मीडियावर अपलोड करण्याचा एक नवा ट्रेंड सुरु झालेला दिसून येत आहे. या आकर्षक अन अॅनिमेटेड इमेजेसची भुरळ जगभरातल्या लोकांना पडली आहे. यामध्ये आता भारतीय राजकारणातील नेत्यांचाही समावेश होताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घिब्ली इमेज त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. ज्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्याप्रमाणात चर्चा होताना दिसतायत.

घिब्ली (Ghibli Images) कला म्हणजे –

घिब्ली कला म्हणजे स्टुडिओ घिब्लीच्या अनोख्या शैलीतील छायाचित्रे . ज्यामध्ये पेस्टल अन म्यूट कलर पॅलेट आणि गुंतागुंतीच्या तपशीलांचा वापर केलेला असतो. ही दृश्य शैली तिच्या सर्जनशील खोलीमुळे आणि कथाकथनाच्या आकर्षणामुळे अ‍ॅनिमे चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे.

मुख्यमंत्री यांची घिब्ली इमेज पोस्ट –

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चॅट जीपीटीच्या घिब्लीची वापर केला असून , त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा घिब्ली शैलीतील छायाचित्र एक्सवर शेअर केले आहे. या छायाचित्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस अन कन्या दिविजा दिसत आहेत. तसेच बऱ्याच युजर्सनी याचा वापर करून त्यांच्या कुटुंबातील सदस्य, मित्र अन इतरांचे एआय-जनरेटेड घिब्ली शैलीतील छायाचित्र तयार केली आहेत. यासोबतच मोठ्या कंपन्यांमध्येही याची भूरळ पडली आहे.

‘घिब्ली स्टुडिओ’च्या शैलीतील इमेज जनरेटर सेवा –

चॅट जीपीटीने आपल्या युजर्ससाठी ‘घिब्ली स्टुडिओ’च्या शैलीतील इमेज जनरेटर सेवा सुरू केली आहे. युजर्स आपले फोटो आणि लोकप्रिय मेम्स घिब्ली शैलीतील कलाकृतीत रूपांतरित करत आहेत. स्टुडिओ घिब्लीचे सह-संस्थापक हयाओ मियाझाकी यांनी एआयच्या वापरावर विरोध व्यक्त केला असून, त्यांचे म्हणणे आहे की यामुळे मानवांच्या सर्जनशीलतेला हानी पोहोचेल. चॅट जीपीटीने घिब्लीच्या अनोख्या शैलीत इमेजेस तयार केल्यामुळे, काही कायदे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे काम कॉपीराईटचे उल्लंघन करू शकते, कारण एआयला घिब्लीच्या मूळ कलाकृतींवर आधारित प्रशिक्षण देण्यात आले आहे.