हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे युसर्समध्ये लोकप्रियता मिळवत आहे . BSNLचे रिचार्ज प्लॅन इतर टेलीकॉम कंपन्या जियो, एयरटेल आणि व्हीआयच्या तुलनेत कमी किमतीत चांगले फायदे देतात. आता लाँच केलेला BSNLचा प्लॅन जास्त व्हॅलिडिटी देखील ऑफर करत आहे. . त्यामुळे लोकांच्या खिशाला तोटा सहन करावा लागत नाही . त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत जास्त नफा मिळवण्याची संधी मिळाली आहे.
BSNLचा 249 रुपायांचा प्लॅन
बीएसएनएलच्या 45 दिवसांच्या प्लॅनची किंमत 249 रुपये असून , ज्यांना आपला नंबर खूप कालावधीसाठी चालू ठेवायचा असेल , त्यांच्यासाठी हा प्लॅन योग्य ठरणार आहे. यामध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 45 दिवसांमध्ये 90 GB डेटा मिळतो, म्हणजे दररोज 2GB जास्त गतीचा इंटरनेट डेटा उपलब्ध आहे. या किमतीत इतर कंपन्या जसे की जिओ, एयरटेल आणि व्हीआय असे फायदे देत नाहीत. तसेच एवढ्या कमी रिचार्जमध्ये बाकी कंपन्या जास्त कालावधी देत नाही . त्यामुळे ग्राहकवर्ग याकडे आकर्षित होताना दिसत आहे.
नवीन युजर्सना फायदा
या प्लॅनचा फायदा प्रामुख्याने नवीन युजर्सना होणार आहे, कारण हा फर्स्ट रिचार्ज कूपन (FRC) ऑफर अंतर्गत उपलब्ध आहे. त्यामुळे जो वापरकर्ता पहिल्यांदाच बीएसएनलमध्ये शिफ्ट होत आहे किंवा पोर्ट करतो, त्याला या प्लॅनचा लाभ घेता येईल. BSNLच्या या अनोख्या ऑफरमुळे कंपनीचा ग्राहक वाढवण्यास मदत होईल.