नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आणि विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एप्रिल 2025 मध्ये बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत. जर तुम्हाला बँकिंगशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर ही यादी नक्की पाहा आणि तुमची कामे आधीच पूर्ण करा.
एप्रिलमध्ये किती दिवस बँका बंद राहणार?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, प्रत्येक रविवारी आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारी देशभरातील सर्व खासगी व सरकारी बँका बंद राहतात. याशिवाय, विविध राज्यांमध्ये सणानुसार अतिरिक्त सुट्ट्या असणार आहेत.
बँक हॉलिडे यादी (एप्रिल 2025)
- 1 एप्रिल: नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात – बँका सार्वजनिक व्यवहारांसाठी बंद
- 5 एप्रिल: बाबू जगजीवन राम जयंती – देशभरातील बँका बंद
- 10 एप्रिल: महावीर जयंती – कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल आणि तेलंगणामधील बँका बंद
- 14 एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, हिमाचल प्रदेश आणि चंदीगड येथे बँका बंद
- 15 एप्रिल: बिहू नववर्ष (असम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश)
- 21 एप्रिल: गरिया पूजा (त्रिपुरा)
- 29 एप्रिल: परशुराम जयंती (हिमाचल प्रदेश)
- 30 एप्रिल: बसवा जयंती (कर्नाटक)
एकूण 14 दिवस बँक सुट्ट्या असणार आहेत, त्यामुळे बँकेच्या वेळापत्रकानुसारच तुमच्या आर्थिक कामांचे नियोजन करा. ऑनलाइन आणि मोबाईल बँकिंग पर्यायांचा लाभ घेऊन व्यवहार सुलभ करा.