Chikenpox : बदलत्या हवामानामुळे वाढतोय कांजण्या होण्याचा धोका; पहा कसा कराल बचाव?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chikenpox) बदलत्या हवामानाचा आपल्या शरीरावर विशेष परिणाम होत असतो. कधी चांगला तर कधी वाईट. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील उष्णता प्रचंड वाढली आहे. अशातच काही ठिकाणी पावसाच्या मुसळधार सरी पडून गेल्या. अशा सतत बदलणाऱ्या हवामानाचा मानवी आरोग्यावर मोठा गंभीर परिणाम होत असतो. या वातावरणात कांजण्या होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

गेल्या फेब्रुवारी- मार्च महिन्यादरम्यान कांजण्यांचा वाढता संसर्ग चिंतेची बाब ठरला होता. यानंतर आता पुन्हा एकदा तापमानात होणारे बदल कांजण्या होण्याचा धोका निर्माण करत आहेत. त्यामुळे कांजण्यांपासून मुलांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. ते कसे कराल? याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत.

कांजण्या म्हणजे काय? (Chikenpox)

कांजण्‍या हा एक संसर्गजन्य आजरा आहे. जो Varicella Zoster नावाच्‍या विषाणूमुळे होतो. हा विषाणू अत्यंत सांसर्गिक असतो. यामुळे शरीरावर पाणथळ फोडांचे पुंजके उठतात. हे फोड फुटल्यास त्यातून पाणी येते आणि अशक्य वेदना सहन कराव्या लागतात. या संसर्गजन्य आजाराचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होतो. त्यामुळे पालकांनी यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करत राहणे गरजेचे आहे. जेणेकरून मुलांमध्ये या संसर्गजन्य रोगांचा धोका कमी करता येईल.

कांजण्या कशामुळे होतात?

आरोग्य तज्ञ सांगतात की, कांजण्या व्हॅरिसेला- झोस्टर नावाच्या विषाणूमुळे होतो. हा विषाणू व्यक्तीच्या शरीरावर थेट मारा करतो आणि त्याला संक्रमित करतो. (Chikenpox) या विषाणूच्या संपर्कात आल्यास व्यक्तीच्या शरीरावर पुरळ येते आणि यातूनच कांजण्यांचा प्रसार होण्याचा धोका वाढू शकतो. कांजण्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीला खोकला किंवा शिंक आल्यासदेखील संसर्ग पसरण्याचा धोका संभवतो.

कोणाला धोका?

एकतर हा विषाणू सर्वाधिक प्रभावाने लहान मुलांना संक्रमित करतो. याशिवाय ज्या लोकांना याआधी कांजण्या (Chikenpox) झालेल्या नाहीत वा कांजण्यांसाठी लसीकरण केलेले नाही त्यांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. तसेच एकदा कांजिण्या होऊ गेलेल्या लोकांमध्ये अँटिबॉडिज तयार झाल्यानंतर त्याचा धोका नंतर कमी असतो. पण काही लोकांना एकापेक्षा जास्त वेळा देखील कांजिण्या येऊ शकतात.

प्रतिबंधात्मक उपाय

कांजण्यांपासून बचाव करायचा असेल तर लसीकरण हाच एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. लहान मुले, किशोरवयीन तरुण आणि प्रौढ व्यक्तींनीदेखील कांजण्यांच्या लसीचे २ डोस घ्यायला हवे. या लसी इतक्या प्रभावी असतात की, कांजण्यांच्या संक्रमणापासून आपला बचाव करू शकतात. (Chikenpox) तसेच कांजण्या झालेल्या व्यक्तीपासून योग्य अंतर राखणे आणि वेळोवेळी हात स्वच्छ धुणे यामुळेदेहीला कांजण्या होणे थांबवता येते.