China’s DeepSeek AI ChatGPT Model: चीनच्या AI मॉडेलची जगाला धडकी!! OpenAI, META संकटात?

0
2
China's DeepSeek AI ChatGPT Model
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । China’s DeepSeek AI ChatGPT Model – यंदा चीनच्या DeepSeek AI लॅबने आपले नवीन AI मॉडेल DeepSeek-V3 लाँच केले आहे. ज्यामुळे जागतिक टेक क्षेत्रात खळबळ माजली आहे. हे मॉडेल चॅट GPT सारखेच आहे. यामुळे अमेरिका सारख्या प्रमुख टेक कंपन्यांची चिंता वाढली आहे. DeepSeek-V3 ची कार्यक्षमता आणि कार्यप्रदर्शन अमेरिकेच्या AI मॉडेल्सला टक्कर देत आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या AI क्षेत्रातील वर्चस्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

मॉडेलला फार कमी खर्च (China’s DeepSeek AI ChatGPT Model)

काही वर्षांपासून OpenAI, Meta आणि Google सारख्या कंपन्या AI डेव्हलपमेंटमध्ये अग्रेसर होत्या, पण चीनने DeepSeek-V3 च्या माध्यमातून एक मोठे पाऊल उचलले आहे. तसेच या मॉडेलला तयार करण्यासाठी फार कमी खर्च आला आहे, त्याचे प्रमुख कारण चीनवर AI साठी आवश्यक असलेल्या हार्डवेअरवर US ने बंदी घातली होती. या प्रतिबंधांनंतरही, DeepSeek ने अत्याधुनिक AI तयार करण्यासाठी विविध कल्पना (creativity) वापरल्या आहेत.

स्वस्त आणि ओपन सोर्स AI मॉडेल –

DeepSeek-V3 (China’s DeepSeek AI ChatGPT Model) ची महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे हे एक स्वस्त आणि ओपन सोर्स AI मॉडेल आहे. पारंपारिक AI सिस्टीम्स तयार करण्यासाठी अरबो डॉलर लागतात, मात्र DeepSeek-V3 हे विविध साधनांचा अधिक प्रभावी वापर करून तयार करण्यात आले आहे. त्याच्या यशाने हे सिद्ध केले की, मर्यादित बजेट आणि नवा दृष्टिकोन ठेवूनही उच्च दर्जाचे AI मॉडेल तयार केले जाऊ शकते.

AI उद्योगाला जागतिक स्पर्धेत महत्त्वपूर्ण स्थान –

यूएसने चीनच्या AI संशोधनावर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला होता, विशेषत: AI सिस्टीम तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या चिप्सच्या पुरवठ्यावर. पण DeepSeek-V3 च्या यशाने हे स्पष्ट केले आहे की, महागड्या हार्डवेअरची आवश्यकता नाही आणि चीनने त्या अडथळ्यांना मात दिली आहे. DeepSeek च्या अभियंत्यांनी नवे मार्ग शोधत तंत्रज्ञानाचा जास्त वापर केला, ज्यामुळे चीनच्या AI उद्योगाला जागतिक स्पर्धेत महत्त्वपूर्ण स्थान मिळाले.

AI क्षेत्रात शक्तिशाली स्पर्धक –

DeepSeek-V3 चे यश एका नव्या युगाची सुरुवात दर्शविते. हे मॉडेल अमेरिकन AI उद्योगासाठी एक आव्हान ठरू शकते. DeepSeek-V3 (China’s DeepSeek AI ChatGPT Model) ची वाढती लोकप्रियता अमेरिका आणि इतर देशांमध्ये अधिक गुंतवणूक आणि क्रिएटिव्हिटीच्या दृष्टीने दबाव निर्माण करेल. DeepSeek-V3 एक ओपन सोर्स प्रोजेक्ट असल्यामुळे, त्याचा वापर जगभरातील डेव्हलपर्स करू शकतात, ज्यामुळे विकसनशील देशांमध्ये आणि छोट्या कंपन्यांमध्ये AI तंत्रज्ञानाच्या विस्ताराची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या नवकल्पनांसाठी एक नवीन मार्ग उघडला आहे, आणि चीनने आता AI क्षेत्रात एक शक्तिशाली स्पर्धक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.

हे पण वाचा : कोरोनाची उत्पत्ती कशी झाली? ट्रम्प यांचा धक्कादायक खुलासा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज