CIBIL Score : CIBIL स्कोर चांगला असेल तर झटपट मिळेल स्वस्त होम लोन; ऑनलाईन कसा चेक कराल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (CIBIL Score) हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर कोणताही सामान्य माणूस होम लोन घेण्याचा विचार करतो. दरम्यान आरबीआयने (RBI) मे २०२२ साली रेपो दरात सातत्याने वाढ करण्यास सुरुवात केली आहे. ती वाढ अद्याप सुरूच आहे. रेपो दरातील वाढीमुळे अर्थव्यवस्थेतील व्याजदर हे उच्च पातळीवर आहेत. असे असले तरीही स्वस्त कर्ज घेण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्हीही कमी दरात स्वस्त गृहकर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर सगळ्यात सोपा आणि महत्वाचा मार्ग म्हणजे तुमचा CIBIL स्कोअर.

CIBIL स्कोअर (CIBIL Score)

जर तुम्ही गृहकर्जावर स्वस्त व्याजदर मिळवण्याचा मार्ग शोधात असाल तर आम्ही तुम्हाला सांगू की यासाठी सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे चांगला CIBIL स्कोर असणे. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला गृहकर्जावर व्याजदरात सूट देईल.

(CIBIL Score) आता सिबिल स्कोअरविषयी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, सिबिल स्कोअर हा एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर असतो. हासिबिल स्कोअर किमान ३०० ते ९०० च्या मध्ये असतो. दरम्यान, ज्या व्यक्तीचा स्कोअर जेव्हढा जास्त असेल तेव्हढा जास्त चांगला फायदा होतो.

किती CIBIL स्कोअर हवा?

साधारणपणे ७५० पेक्षा जास्त सिबिल स्कोअर असेल तर उत्तम मानले जाते. कारण ७५० हून जास्त सिबिल स्कोअर असलेल्या व्यक्तीला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते आणि व्याजदरदेखील कमी आकारले जाते.

CIBIL स्कोअर काय काम करतो?

CIBIL स्कोअर हा त्या व्यक्तीची पत आणि इतिहास दर्शवतो. अर्थात CIBIL स्कोअरच्या (CIBIL Score) माध्यमातून त्या व्यक्तीने याआधी भूतकाळात कितीवेळा कर्ज घेतले आहे आणि कर्ज भरण्यात चूक केली आहे का? याची माहिती मिळते. याशिवाय CIBIL स्कोअर चांगला असेल तर कर्जदारांस स्वस्त कर्ज मिळविण्यात मदत होते.

किती CIBIL स्कोअरवर गृहकर्ज व्याजदरांवर सवलत मिळते?

जर तुमचा सिबिल स्कोअर -550-649 असेल तर SBI कडून तुम्हाला ९.६५ % दराने कर्ज दिले जाते. तसेच जर तुमचा सिबिल स्कोअर -650-699 असेल तर बँक तुम्हाला ९.४५ टक्के दराने कर्ज देईल. याशिवाय -700-749 सिबिल स्कोअर असणाऱ्या व्यक्तीला SBI कडून ९.३५ टक्के दराने कर्ज दिले जाते. तर -750-800 सिबिल स्कोअर असेल किंवा त्याहून जास्त असेल तर अशा कर्जदारास बँक ९.१५ टक्के दराने गृहकर्ज दिले जाते. (CIBIL Score)

कर्ज घेण्यापूर्वी असा तपासा CIBIL स्कोअर

स्वस्त व्याजदरासह कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअर फायदेशीर ठरतो. म्हणून बँकेत जाण्यापूर्वी आपला CIBIL स्कोअर जरूर तपासा. यासाठी तुम्हाला CIBIL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाईट लिंक पुढीलप्रमाणे: https://www.cibil.com/

या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही ‘तुमचा सिबिल स्कोअर मिळवा’ हा पर्याय निवडा. यानंतर वार्षिक CIBIL स्कोर जाणून घेण्यासाठी ‘येथे क्लिक करा’ वर क्लिक करा आणि यामध्ये आवश्यक तपशील (तुमचे नाव, ई-मेल आयडी, पासवर्ड) भरा. (CIBIL Score) यानंतर ओळखपत्राचा पुरावा (पासपोर्ट क्रमांक, पॅन कार्ड, आधार किंवा मतदार ओळखपत्र) संलग्न करा आणि त्यानंतर तुमचा पिन कोड, जन्मतारीख, फोन नंबर टाका.

पुढील प्रक्रियेसाठी ‘स्वीकारा आणि सुरू ठेवा’ पर्यायवर क्लिक करा. आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) येईल तो इथे भरून ‘सुरू ठेवा’ हा पर्याय निवडा. शेवटी ‘डॅशबोर्डवर जा’ ​​हा पर्याय निवडा आणि तुमचा क्रेडिट स्कोअर ऑनलाईन पद्धतीने तपासा. (CIBIL Score)