Cidco Homes : ‘या’ भागात सुरु होणार सिडकोचा नवा प्रकल्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cidco Homes : ज्यांचे स्वात:च्या घराचे स्वप्न अद्यापही पूर्ण झाले नाही अशांसाठी सिडको आणि म्हाडा च्या योजना स्वप्न पूर्ण करणाऱ्या ठरतात. एकीकडे मोठ्या शहरांमध्ये घरांच्या किंमती गगनाला भिडत आहेत. अशा स्थितीत मध्यमवर्गीयांचे हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडा आणि सिडको (Cidco Homes) पूर्ण करतात.

14 मजली पाच टॉवर

मिळालेल्या माहितीनुसार सिडकोच्या (Cidco Homes) वतीनं आता पनवेल भागामध्ये एक नवी योजना हाती घेण्यात आली आहे. पनवेलमध्ये विविध नोंद विकसित करण्यात येणार असून यामध्ये गृहप्रकल्पांचे पुनर्विकास तसेच नव्या गृहनिर्माणाचा समावेश आहे. याचा फायदा आता मध्यमवर्गीयांना होणार आहे. पुनर्विकास योजनेअंतर्गत तीन मजली इमारतींच्या जागेवर 14 मजली पाच टॉवर बांधले जाणार आहेत. खांदा कॉलनीतील या प्रकल्पाची निर्मिती 3 वर्षांत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ज्यामुळं या योजनेता थेट लाभ मध्यमवर्गीय कुटुंबांना होणार आहे. खांदा कॉलनीमध्ये असणाऱ्या पीएल 6 प्रकारच्या सह्याद्री सोसायटीचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला.

या भागात प्रकल्प (Cidco Homes)

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी या भागांमध्ये असणारे सिडको (Cidco Homes) नोडमधील अनेक प्रकल्प सध्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या भागातील काम पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे.

49 व्यावसायिक गाळ्यांचाही समावेश

मुंबई पुणे महामार्गाला लागून असणाऱ्या खांदा कॉलनीतील (Cidco Homes) गृहप्रकल्पाला पुढील काही दिवसांमध्ये नवं रुप प्राप्त होणार आहे. राज ग्रुपच्या तुलसी होममेकर कंपनीकडून हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. यामध्ये 192 जुन्या घरधारकांना वाढीव कार्पेट एरियासह प्रशस्त घरं दिली जाणार आहेत. शिवाय 460 नवी घरंसुद्धा बांधली जाणार आहेत. याव्यतिरिक्त 49 व्यावसायिक गाळ्यांचाही इथं समावेश असणार आहे.