Cidco Lottery 2024 : मुंबईसारख्या भल्या मोठ्या मायानगरीमध्ये स्वतःचं घर घेणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. सध्या घरांचे दर हे गगनाला भेटले असता लाख आणि कोटींच्या घरात गेले असताना सिडको आणि म्हाडा यासारख्या संस्था सर्वसामान्यांच्या घराचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशेचा किरण ठरतात. म्हणूनच सिडको आणि म्हाडा या गृहनिर्माण संस्थांच्या घरांसाठी अर्ज निघाले की प्रत्येक जण यामध्ये घर घेण्यासाठी धडपड करीत असतो. आता मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडको 25000 घर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विक्रीस आणणार (Cidco Lottery 2024) असल्याची माहिती मिळाली आहे.
सिडकोला मागील सात वर्षात विविध घटकांसाठी 25 हजारांपेक्षा अधिक घरांची निर्मिती केली असून पुढच्या चार वर्षात चार टप्प्यात आणखी 67000 घर बांधण्याचं नियोजन केलं आहे. त्यातील 41000 घरांचा बांधकाम हे प्रगतीपथावर असून सर्व घर ही ‘निवडा तुमच्या आवडीचे घर’ या संकल्पने अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध करण्याची सिडकोची योजना असल्याची माहिती (Cidco Lottery 2024) आहे. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचा स्वप्न आता साकार होणार आहे.
या भागातील घरांचा समावेश (Cidco Lottery 2024)
सिडको सध्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी विविध नोड मध्ये घरे बांधत आहे. सध्याचा विचार करता तळोजा, वाशी, जुईनगर, खारघर, कामोठे, मानसरोवर, करंजाडे, कळंबोली या नोडमध्ये सिडकोच्या गृह प्रकल्पांची बांधकामे सुरू असल्याची माहिती आहे. त्यातही जवळपास 21000 घर हे एकट्या तळोजा नोड मध्ये बांधली जात आहेत. असं असलं तरी मानसरोवर, खारघर,जुईनगर आणि वाशी येथील घर मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे ग्राहकांना या प्रकल्पातील घरांच्या योजनेची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. आचारसंहितेपूर्वी प्रस्तावित केलेल्या गृह योजनेत कोणत्या प्रकल्पातील घरांचा समावेश करायचा या संदर्भात संबंधित विभागांना चाचपणी (Cidco Lottery 2024) सुरू केल्याची माहिती आहे.
‘बुक माय सिडको होम’ चा अवलंब (Cidco Lottery 2024)
- ‘बुक माय सिडको होम’ अर्थात ‘निवडा तुमच्या आवडीचं घर’ या संकल्पनेचा अवलंब करण्याची सिडकोची योजना आहे.
- यांतर्गत ग्राहकांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्या तत्वावर त्यांच्या पसंतीचे घर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- ही प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे.
- या अंतर्गत विमान तिकिटाच्या धरतीवर ग्राहकांना आपल्या पसंतीचे घर सिलेक्ट करण्याचं स्वातंत्र्य आहे.
- ही सर्व घरे संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहेत.
- यात घराच्या क्षेत्रफळ नकाशा तसेच किंमत आदींचा इत्यंभूत तपशील असेल.
- कागदपत्र अपलोड केल्यानंतर डिपॉझिट भरून घर आरक्षित करता येणार आहेत.
आतापर्यंतची सर्वात मोठी ग्रह योजना (Cidco Lottery 2024)
सिडकोच्या माध्यमातून आतापर्यंत विविध घटकांसाठी जवळपास दीड लाख घर बांधून त्यासाठी वेगवेगळ्या गृह योजना जाहीर केल्या गेल्यात. 2018 मध्ये दोन टप्प्यात जवळपास 18000 घरांची योजना जाहीर केली होती. (Cidco Lottery 2024) आतापर्यंतची ती सर्वात मोठी गृह योजना ठरली होती. मात्र आता सिडकोच्या इतिहासात पहिल्यांदाच 25 हजार घरांची बंपर योजना प्रथमच जाहीर होत आहे